पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषणे कोण लिहितं? याबाबतची माहिती जाणून घ्या

नवी दिल्ली | आपल्या भाषण शैलीमुळे आणि संवाद कौशल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खूप प्रभावी वक्ते समजले जातात. मोठ्या जनसमुदायाला आपल्या वकृत्व शैलीने आपल्या सोबत जोडण्याची कला त्यांच्याजवळ आहे. देशातील कोणत्याही भागात गेले तरी त्या भागातील वैशिष्ट्य आणि बोली ही त्यांच्या भाषणामध्ये असते. त्या जोरावर ते लोकांशी जवळून संवाद साधतात. बऱ्याच वेळा या भाषणामध्ये चुकीचे संदर्भही दिसून येतात. यामुळे त्यांचे भाषण कोण लिहतात अशी चर्चा बऱ्याचदा पाहायला मिळते. त्यामुळे हे भाषण कोन लिहते, या भाषणासाठी नेमका किती खर्च येतो, मोदींच्या टीम मध्ये किती लोक आहेत? असे प्रश्न अनेकांना पडतात. याबाबत विचारल्या गेलेल्या प्रश्नाला पंतप्रधान कार्यालयाने याविषयी माहिती पुरवली आहे.

इंडिया टुडे या माध्यम समूहाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भाषणाबाबत आणि त्यासाठी येणार्‍या खर्चाबाबत माहिती अधिकारा अंतर्गत माहिती मागवली होती. या मागवलेल्या माहितीच्या उत्तरादाखल पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, पंतप्रधान आपल्या भाषणाला अंतिम स्वरूप ते स्वतःच देतात. ज्या ठिकाणी कार्यक्रम असतो, ज्या प्रकारचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमानुसार त्यांनी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची, व्यक्तींची, संघटनेची आणि विभागाकडून माहिती पुरवली जाते. हे सर्व मिळून माहिती देतात आणि त्या माहितीला अंतिम स्वरूप हे पंतप्रधान स्वतः च देत असतात.

माहिती अधिकाराच्या अंतर्गत विचारलेल्या या प्रश्नाच्या उत्तरात दिलेल्या माहितीमध्ये त्यांनी या सर्व बाबींचा खर्च आणि टीमबाबत विस्तृत माहिती दिली नाही. ही भाषणे कोण लिहिते, तसेच या टीममध्ये किती लोक आहेत, या लोकांना आणि भाषणे लिहिण्यासाठी किती खर्च येतो. अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते. मात्र या प्रश्नांची उत्तरे प्रधानमंत्री कार्यालयाने दिली नाही. यामुळे याची सर्वत्र चर्चा आता पाहायला मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like