हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात कोरोनाव्हायरसचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. कोरोनाने संक्रमित रूग्णांची संख्या ही ३ लाखांचा टप्पा ओलांडणार असे दिसून येते आहे. अशा परिस्थितीत मान्सूनच्या जोरदार आगमनामुळे लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती वाढली आहे. हवामान तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, जवळजवळ संपूर्ण देशात मान्सून आला आहे. केरळमध्ये मान्सूनने जोरदार धडक मारली असून आता तो उत्तरेकडे सरकला आहे.
मान्सूनच्या या आगमनामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि व्हायरल फिव्हर सारख्या अनेक आजारांचा धोकाही वाढलेला आहे. अशा परिस्थितीत, ही चिंतेची बाब आहे की, व्हायरल फिव्हर आणि कोरोनाच्या लक्षणांमध्ये फारसा फरक नाही आहे आणि म्हणूनच कोरोनाचा हा संसर्ग अधिक वेगाने वाढू शकतो. मान्सूनमुळे लोकांमध्ये कोणत्या प्रकारची भीती निर्माण झाली आहे, यासंबंधी काही प्रश्नांची उत्तरे आम्ही देत आहोत.
हवामानाचा कोरोना विषाणूवर काही परिणाम होतो का ?
कोरोनावर हवामानाचा परिणाम अद्यापपर्यंत तरी झालेल्या कोणत्याही संशोधनात दिसून आलेला नाही. पूर्वी अशा अनेक बातम्या आल्या होत्या की, उन्हाळ्यात कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागतो, परंतु तसे काही दिसून आलेले नाही.
पावसाबरोबर कोरोना विषाणू नष्ट होणार ?
कोरोना विषाणूवर पावसाचा कोणताही परिणाम होणार नाही आहे. येथे समजून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कोरोना हा हवेत नाही आहे. जर तुम्हाला कोरोना टाळायचा असेल तर यासाठी एकच उपाय आहे आणि तो म्हणजे वारंवार हात धुण्याची सवय लावणे आणि स्वच्छतेकडे लक्ष देणे.
हा विषाणू बराच काळ आपल्या घरात राहू शकतो?
कोरोना विषाणू आपल्या घरात कोणत्याही वस्तूवर किंवा फरशीवर बर्याच दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो. अशा वेळी, फरशी पुन्हा पुन्हा साफ करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत घराच्या खिडक्या आणि दारे उघडी ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून घराच्या आत ताजी हवा येऊ शकेल.
पावसाळ्यात कोणत्याही प्रकारच्या गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे ?
पावसाळ्यात कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यता वाढू शकते. अशा परिस्थितीत घरातही चप्पल घालण्याचा प्रयत्न करा. घरातील चप्पल आणि बाहेरची चप्पल वेगवेगळ्या ठेवा. चप्पल बाहेरच काढून पाय धुवून मगच घरात या. वेळोवेळी फरशी स्वच्छ ठेवा तसेच दारे आणि खिडक्या उघडी ठेवण्याचा प्रयत्न करा.
पावसाळ्यात कोरोनाची लागण होण्याची अधिक शक्यता असते ?
तज्ञ म्हणतात की पावसाचा हंगाम हा आजारपणाचा देखील हंगाम असतो. या हंगामात, बॅक्टेरियाच्या विषाणूची संख्या वेगाने वाढते. अशा परिस्थितीत डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, व्हायरल फिव्हर सारख्या अनेक आजारांचा धोका वाढतो. या हंगामात रोग प्रतिकारशक्ती यंत्रणेला अधिक काम करावे लागते. या हंगामात रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास कोरोना विषाणूच्या संसर्गाची शक्यता देखील वाढते.
पावसात रेनकोट आणि मास्क ओले झाल्यास काय करावे ?
कोरोनाचा विषाणू बराच काळ कपड्यांवर तसाच राहू शकेल. अशा परिस्थितीत, रेनकोट ज्या प्रकारे कपडे धुतले जातात त्याचप्रकारे धुणे आवश्यक आहे. मास्कच्या बाबतीत बोलायचे, जर ते ओले झाले असेल तर लगेचच काढून टाकले गेले पाहिजे. पावसाच्या पाण्यामुळेच नव्हे तर कित्येक वेळा आपल्या तोंडाद्वारेही मास्क ओला होतो. अशा परिस्थितीत ते त्वरित काढून टाकले पाहिजे आणि दुसरा मास्क वापरला पाहिजे.
आर्द्रता वाढली की कोरोनाचे काय होईल ?
पाऊसाच्या या हंगामात होणाऱ्या आर्द्रतेबाबत अनेक तज्ञांची मते भिन्न आहेत. आयआयटी बॉम्बेच्या म्हणण्यानुसार वाढत्या आर्द्रतेमुळे कोरोना विषाणू हा आणखी धोकादायक होईल. तर काही तज्ञ म्हणतात की या आर्द्रतेमुळे कोरोनाचा संसर्ग कमी होईल. खोकला आणि शिंकताना पाण्याचे थेंब बाहेर पडतात. हवेतील आर्द्रतेमुळे हे थेंब वाढतात आणि खाली पडतात. त्यामुळे याचा शरीरावर परिणाम देखील कमी होतो.
पावसाळ्यात एसी लावणे किती सुरक्षित आहे ?
पावसाळ्यात घरामध्ये एसी चालविली जाऊ शकते, मात्र घरात जास्त मेंबर्स असतील तर ते टाळले पाहिजे. तसेच, जेथे सेंट्रल एसी आहे, तेथे तो वापरू नये. सेंट्रल एसीमधून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता वाढली आहे.
पावसाळ्यात आपण एसी बस किंवा ट्रेनमध्ये प्रवास केला पाहिजे का ?
पावसाळ्यात एसीमध्ये न थांबणे चांगले. जर कोणताही संक्रमित रुग्ण बस किंवा ट्रेनमध्ये उपस्थित असेल तर यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो, परंतु जर तुम्ही नॉन एसी बस किंवा ट्रेनमध्ये प्रवास करत असाल तरीही संसर्ग होण्याची शक्यता असतेच पण एसीपेक्षा खूपच कमी.
पावसाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय करावे ?
पावसाळ्यात या बॅक्टरीयांचा प्रतिकार करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत आपण जीवनसत्त्वे, ए, बी, सी, डी, लोह आणि जस्त असलेले फळ खावे. त्याबरोबर जेवणात लोणचे, लिंबू, गाजर, संत्री, डाळिंब, अक्रोड, बदाम, शेंगदाणे, लसूण आणि पालक ठेवा.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.