कामगारांची घरवापसी रेल्वेने की बसने? गृहखाते म्हणते…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकडाउनमुळे देशाच्या विविध राज्यामध्ये अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी पाठविण्यासाठी गृह मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केल्यानंतर काही राज्ये केंद्र सरकारकडे यासाठी रेल्वे सुरु करण्याची मागणी करत आहेत.राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून रेल्वे सुरु करण्याची मागणी केली आहे.मात्र, गुरुवारी गृह मंत्रालयाने कोविड १९ च्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे की,सध्या फक्त बसेसद्वारे लोकांना त्यांच्या डेस्टिनेशनवर पाठवले जाऊ शकते.

 

त्याचवेळी तेलंगणाचे मंत्री तलासणी श्रीनिवास यादव यांनीही रेल्वे सुरु करण्याची मागणी केली आहे. गुरुवारी ते म्हणाले, ‘लोकडाउनमुळे सुमारे दोन कोटी लोकं ही विविध राज्यात अडकून पडले आहेत.केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्वे चांगली नाहीत.इतक्या उन्हात लोक ३ ते ४ दिवस बसमध्ये प्रवास कसा करू शकतील. बसेसपेक्षा रेल्वे गाड्या हा एक चांगला पर्याय आहे.

 

 

या लाखो श्रमिक तसेच प्रवासी कामगारांच्या सुरक्षित घरी जाण्यासाठी केंद्र सरकारने कोणताही विलंब न करता विशेष गाड्या सुरु कराव्यात,असे आवाहन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पंतप्रधानांकडे केले आहे.

बुधवारी गृह मंत्रालयाने एक मार्गदर्शक सूचना जारी केली आणि लॉकडाउनमुळे अडकलेल्या या लोकांच्या जाण्या-येण्यास सशर्त परवानगी दिली जात असल्याचे राज्यांना सांगितले.राज्यांनी त्यांच्यासाठी बस पुरवाव्यात आणि या बसेस पूर्णपणे स्वच्छ केल्या जाव्यात आणि सोशल डिस्टंसिंगची विशेष काळजी घेतली जावी.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.