साऊथम्पटन : वृत्तसंस्था – 18 ते 22 जूनदरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. हा सामना इंग्लंडमधील साऊथम्पटन या मैदानात खेळवण्यात येणार आहे. या महामुकाबल्यासाठी टीम इंडियाच्या 15 खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. या टीममधून शार्दुल ठाकूर, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि मयंक अग्रवाल यांना बाहेर ठेवण्यात आले आहे. या सामन्यासाठी भारतीय टीम 20 खेळाडू आणि चार स्टॅण्डबाय खेळाडूंना घेऊन इंग्लंडला रवाना झाली आहे.
🗒️ #TeamIndia announce their 15-member squad for the #WTC21 Final 💪 👇 pic.twitter.com/ts9fK3j89t
— BCCI (@BCCI) June 15, 2021
साऊथम्पटनमध्ये फायनलच्या प्रत्येक दिवशी 70-80 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हि खेळपट्टी जलद असून त्यावर बाऊन्सही असेल असे साऊथम्पटनच्या पिच क्युरेटरने सांगितले आहे. पाऊस, ढगाळ वातावरण आणि खेळपट्टी यामुळे जडेजा आणि अश्विन यांच्यापैकी एकाच स्पिनरना खेळवायचं का? तसेच इशांत शर्माला संधी द्यायची का मोहम्मद सिराजला? हे प्रश्न विराटसाठी डोकेदुखी ठरणार आहेत.
फायनलसाठी भारतीय टीम
रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, ऋद्धीमान साहा, आर.अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज