हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या संसर्गाचा वाढत धोका लक्षात घेता, देशात मास्क, सॅनिटायझर्स आणि पीपीईच्या किटची मागणी वाढत आहे. या दरम्यान, सध्या गरज असलेल्या या वस्तू बेकायदेशीरपणे चीन तसेच अन्य देशांत एक्सपोर्ट केल्याचा एक प्रकार नुकताच समोर आला आहे. गुप्तचरां कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दिल्लीतील आयजीआय विमानतळावर एयर कार्गो वर कस्टम विभागाकडून छापे टाकण्यात आले. कस्टम विभागाने येथे ५.८ लाख मास्क ,९५० बाटल्यांमध्ये ५७ लिटर सॅनिटायझर्स आणि नवी दिल्ली कुरियर टर्मिनल येथे ९५२ पीपीई किटस यासह अनेक शिपमेंट अडवले. यांना देशातून बाहेर नेण्याचा किंवा निर्यात करण्याचा प्रयत्न केला गेला. त्याशिवाय २४८० किलो कच्चा मालही कस्टमने जप्त केला, जो चीनला पाठविला जात होता.
आता या प्रकरणाचा तपास केला जात असून परदेशात हे सामान कोण पाठवत होते याचा हे शोधले जात आहे. डीजीएफटीच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार हे सामान निर्यात केले जाऊ शकत नाहीत. परंतु हे लक्षात घेण्यासारखे आहे की सध्या देशात कोरोना विषाणूचा साथीचे संकट आहे, अशा परिस्थितीत भारत सरकारने बर्याच वैद्यकीय वस्तूंच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. १९ मार्च रोजीच केंद्र सरकारने या वस्तूंची निर्यात थांबविली होती. त्यामध्ये सॅनिटायझर्स, मास्क देखील सामील आहेत. त्याचवेळी या संकटामुळे भारतात एन-९५ मास्क आणि पीपीई किट बनवण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.
कोरोना व्हायरसच्या या लढाईत या वैद्यकीय वस्तू महत्वाची भूमिका बजावतात. कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांबरोबरच या वैद्यकीय उपकरणांची मागणीही सतत वाढत आहे. अशा परिस्थितीत हा माल गुप्तपणे परदेशात पाठविणे हा गुन्हा मानला जातो आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जनतेने सूचना दिल्या
कोरोना संकटाच्या या काळात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील लोकांकडून सूचना मागितल्या. यानंतर जनतेने मुख्यमंत्री केजरीवाल यांना अनेक सूचना दिल्या आहेत. केजरीवाल यांनी दिल्लीकरांना विचारले होते की काय सुरु केले पाहिजे आणि काय सुरु करू नये ? त्याबद्दल लोकांनी सांगा.
लोकांनी बर्याच मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले. ज्यामध्ये बहुतेक लोकांनी वाहतूक, व्यवसाय, शाळा-महाविद्यालय आणि उद्योग परत रुळावर आणण्याविषयी सुचविले. तसेच काही लोकांनी मेट्रो, बस, टॅक्सी सुरु करण्याबाबत आपल्या सूचना दिल्या आहेत. तसेच, या बदललेल्या परिस्थितीत लोकांनी शाळा-महाविद्यालयीन कामकाजाविषयीही त्यांच्या महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. आता या सूचना अंमलात आणण्यासाठी दिल्ली सरकार पुढाकार घेईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.