नवी दिल्ली । कमी व्याजदराच्या या काळात बजाज फायनान्स लिमिटेड (Bajaj Finance Limited) आपल्या ग्राहकांना एफडीवर 6.85 टक्के व्याज देत आहे. इतर एफडीपेक्षा चांगल्या व्याजा व्यतिरिक्त बजाज फायनान्स एफडीचेही फायदे येथे दिलेले आहेत.
गेल्या वर्षभरात एफडीवरील व्याजदरामध्ये मोठी कपात झाली आहे. हेच कारण आहे की, बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट ठेवणार्या गुंतवणूकदारांना अत्यल्प परतावा मिळतो आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) एक वर्षाच्या ठेवींवर 5.5 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. तथापि, बजाज फायनान्स लिमिटेड आपल्या ग्राहकांना एफडी वर 6.60 टक्के व्याज देत आहे. ज्येष्ठ ना गारिकांना याचा अतिरिक्त 0.25 टक्के लाभ मिळत आहे.
बजाज फायनान्समध्ये 12 महिने ते 60 महिने म्हणजे 5 वर्षांसाठी एफडी करता येते. गुंतवणूकदार बजाज फायनान्स एफडीमध्ये किमान 25,000 रुपयांची गुंतवणूक करु शकतात.
बजाज फायनान्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणे देखील खूप सोपे आहे. ऑनलाइन प्रक्रियेअंतर्गत एखादा गुंतवणूकदार घरबसल्या यात गुंतवणूक करू शकतो.
बजाज फायनान्स अनिवासी भारतीयांना, परदेशी नागरिकांना आणि भारतीय मूळ व्यक्तींना एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय देखील देते. NRI/OCI/PIO जवळ एक NRO खाते असले पाहिजे. यासाठी गुंतवणूकीचा कालावधी 12 महिने ते 36 महिने आहे.
सिस्टिमॅटिक डिपॉझिट प्लॅन (SDP) अंतर्गत गुंतवणूकदारांना मासिक गुंतवणूकीचा पर्याय देखील उपलब्ध आहे. गुंतवणूकदार SDP च्या माध्यमातून दरमहा अल्प प्रमाणात गुंतवणूक करु शकतात. SDP मार्फत दरमहा जमा होणारी रक्कम 12 महिन्यांपासून ते 60 महिन्यांपर्यंत असेल.
SDP अंतर्गत गुंतवणूकदारास 6 ते 48 महिन्यांच्या कालावधीतील मासिक ठेवीचा पर्याय निवडावा लागेल. प्रत्येक ठेवीच्या तारखेला व्याज दर असेल, संपूर्ण कालावधीसाठी त्या ठेवीवर समान व्याज मोजले जाईल. प्रत्येक ठेवीला SDP अंतर्गत स्वतंत्र एफडी मानले जाते.
बजाज फायनान्स तुम्हाला डेबिट कार्डच्या माध्यमातून एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास देखील अनुमती देते.
आपल्याला आपल्या एफडीवर मासिक व्याज मिळवायचे असेल तर आपण त्यासाठी निवड देखील करू शकता. मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर एफडीवर व्याज मिळण्याची सुविधा आहे. तथापि, व्याज देखील निवडलेल्या पर्यायावर अवलंबून असेल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.