Wednesday, June 7, 2023

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 30 जानेवारी रोजी सर्व पक्षांशी होणार बैठक, 2021 च्या बजेटशी संबंधित मुद्द्यांवर होणार चर्चा

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी 30 जानेवारी रोजी सर्वपक्षीय बैठक घेतील. ही सर्वपक्षीय बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होईल. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होणार आहे. अधिवेशनात 1 फेब्रुवारी रोजी संसदेमध्ये 2021-22 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला जाईल.

संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी (Prahlad Joshi) यांनी बुधवारी ही माहिती दिली. कोरोना व्हायरसमुळे सर्व-पक्षीय बैठक व्हिडिओ-कॉन्फरन्सिंगद्वारे होईल. लोकसभा सचिवालयाच्या निवेदनानुसार दोन भागांत अर्थसंकल्पीय अधिवेशन 8 एप्रिलपर्यंत चालणार आहे. अर्थसंकल्पीय सत्राचा पहिला टप्पा 29 जानेवारीपासून सुरू होईल व 15 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे तर दुसरा टप्पा 8 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीत चालतील.

मागील पावसाळी अधिवेशनाप्रमाणे यावेळेसही संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होणार आहे. दुपारी 4 ते 9 या वेळेत लोकसभेची बैठक होईल तेव्हा दुपारी राज्यसभेची बैठक होईल. कोविड -१९ च्या दृष्टीकोनातून आरोग्य उपायांच्या अंतर्गत हे पाऊल उचलले गेले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.