छगन भुजबळ राजीनामा द्या म्हणत भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन; रेशन दुकानात निकृष्ट तूरडाळ विकली जात असल्याचा आरोप

0
68
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई

अमरावती जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन काळात निकृष्ट दर्जाचे तांदूळ व डाळ सर्व गोरगरीब जनतेला रेशन दुकानाच्या माध्यमातून वाटण्यात आली असल्याचा आरोप होत आहे.  या धान्य वितरणामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून निकृष्ट डाळ व तांदूळ वितरण हे माणुसकीला काळिमा फासणारे आहे. महाराष्ट्र शासनाचा तीव्र निषेध करून जबाबदार असलेल्या मंत्री व अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी वरुड यांनी केली आहे.

कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये अंतोदय, प्राधान्यक्रम असलेल्या लोकांना केंद्र शासनाने ५ किलो तांदूळ व १ किलो डाळ वितरीत करण्याचा निर्णय घेतला होता. भंडारा व गोंदिया येथील अनेक राईस मिल मधून हा निकृष्ट दर्जाचा तांदूळ खरेदी करण्यात आला. त्याची गुणवत्ता खरेदी करतांना किंवा वितरीत करतांना तपासणे आवश्यक होते. परंतु यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याने संपूर्णतः दुर्लक्ष केले गेले. शासकीय नियमाप्रमाणे तुटलेल्या दाण्याची उच्चतम मर्यादा २५% आहे. क्षतिग्रस्त दाण्याची मर्यादा ३% आहे. परंतु प्राप्त झालेल्या दाण्यामध्ये तुटलेल्या आणि क्षतिग्रस्त दाण्याची संख्या ५०% च्यावर आहे. याशिवाय चुरीचे प्रमाण जास्त आहे असा आरोप यावेळि करनात आला.

तांदूळ खरेदी व वितरीत करतांना झालेला भ्रष्टाचार हि मोठी संघटीत गुन्हेगारी आहे. यामध्ये सत्ताधारी पक्षाचे भंडारा व गोंदिया मधील काही लोकप्रतिनिधीचे हात या भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले आहे. म्हणून निकृष्ट दर्जाचा डाळ व तांदूळ वितरणाच्या भ्रष्टाचाराची जबाबदारी स्वीकारून सार्वजनिक वितरणमंत्री छगन भुजबळ यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी वात्रुड शहर व ग्रामीणच्या वतीने करण्यात आली .

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here