सुशांतसिंग राजपूत प्रकरणी कंगना रनौत चा आणखी एक व्हिडीओ; करण जोहरसह पत्रकारांवर साधला निशाणा 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुशांतसिंग राजपूत याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळल्यानंतर त्याच्या मृत्यूबद्दल बऱ्याच गोष्टी बोलल्या जात आहेत. प्रथमदर्शनी त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले असले तरी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने त्याची हत्या झाली असल्याचे म्हंटले आहे. तिने यासंदर्भात एक व्हिडीओ यापूर्वी प्रसिद्ध केला होता ज्यामध्ये बॉलिवूडमधील सत्यता तिने सांगितली होती. तिने आता एक नवीन व्हिडीओ केला असून त्यामध्ये सुशांतसिंग राजपूतच्या नैराश्याचे कारण सांगितले आहे. तसेच माध्यमांवर टीका देखील केली आहे. तिने करण जोहर आणि पत्रकारांवर निशाणा साधला आहे.

या व्हिडिओत तिने सांगितले आहे की काही मुलाखती वाचून आणि काही लोकांशी बोलून तिने काही माहिती मिळवली आहे ज्यामध्ये तिने सांगितले आहे की त्याच्या वडिलांनी तो सिनेक्षेत्रातील काही गोष्टींमुळे निराश होता असे म्हंटले आहे. अभिषेक कपूर तसेच अंकिता लोखंडे यांनी सामाजिक दृष्ट्या केलेला अपमान तो सहन करू शकला नाही असे सांगितल्याचे कंगना म्हणाली. यामध्ये बॉलिवूड माफियांनी त्याला हळूहळू पूर्णतः तोडले असल्याचे ती म्हणाली आणि विविध माध्यमांनी त्याच्याबद्दल लिहिलेल्या नकारात्मक बातम्यांचा देखील उल्लेख केला आहे. त्याला, नार्सिस्ट तसेच तो ट्रक ड्रायव्हर सारखा दिसत असल्याचे या माध्यमांनी लिहिले असे तिने तारीखवार दैनिकांची नावे घेऊन सांगितले आहे. तिने पुन्हा एकदा करण जोहर यांच्यावर निशाणा साधला आहे.

बुद्धिजीवी पत्रकार ज्यांना मुव्ही माफियांनी पाळले आहे. त्याने हे सर्व जाणीवपूर्वक केले असल्याचे तिने म्हंटले आहे. यावेळी तिने ३ हजार पत्रकारांनी मिळून तिचे भावनिक लिंचिंग केले असाही उल्लेख केला आहे. माझा सिनेमा बंद पडू पाहणारे ते लोक महिनाभरात गायब झाले. असे म्हणत तिने हे लोक अशा पद्धतीने एखाद्याला या क्षेत्रातून बाहेर काढण्यासाठी कार्यरत असल्याचा आरोप केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.