“निवडणुकीत नोटांचा वापर केल्याचे मान्य केल्यामुळे आयोगाने राऊतांवर आता…”; आशिष शेलारांची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोव्यातील पराभवावरून भाजपवर निशाणा साधला. निवडणुकीत ज्या प्रकारच्या नोटा वापरल्या, त्याच्यापुढे आम्ही कमी पडलो असे राऊत यांनी म्हंटले. त्यांच्या याच विधानावरून आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला. “संजय राऊतांनी मान्य केलं निवडणुकीत नोटा वापरल्या आहेत. आता निवडणूक आयोगाने राऊतांची चौकशी करावीर, अशी मागणी शेलार यांनी केली आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, संजय राऊत यांनी आज कबुल केले आहे की निवडणुकीमध्ये त्यांनी नोटांचा वापर केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने याची चौकशी करावी. ज्या गोव्यात काहीतरी हाती लागेल अशी अशा शिवसेनेला होती. मात्र तिथेही त्यांची भलतीच निराशा झाली आहे. त्यामुळे भाजप त्याच जखमेवर मीठ चोळत आहे.

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालाचे कल हाती आले असून, भाजप तब्बल दोनशे पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. तर दुसरीकडे गोवा, मणिपूर, उत्तराखंड मध्येही भाजपची आघाडी आहे. भाजपच्या या विजयावर प्रतिक्रिया देताना राऊतांनी काँग्रेसचेही कान टोचले आहे. त्यावरूनच आता आशिष शेलार यांनी राऊत यांना टोला लगावला आहे.

Leave a Comment