हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या संसर्गातून पूर्णपणे बरे झालेल्या दुबईतील एका व्यक्तीने त्याच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली. दुबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा २६ वर्षीय व्यक्ती भारतातील केरळ या राज्यातील आहे. तो दुबईच्या या बिल्डिंगमधील फ्लॅटमध्ये आपले नातेवाइक आणि इतर ६ जणांसह राहत होता. मीडिया रिपोर्टनुसार सोमवारी दुबई पोलिस अधिकाऱ्याने या घटनेची पुष्टी केली आणि हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे सांगितले.
७ मे रोजी रुग्णालयातून सोडण्यात आले
सदर घटनेची माहिती देताना अधिकारी म्हणाले, “तो मानसिकदृष्ट्या स्वस्थ नव्हता. त्याच्या मृत्यूमागे कुठल्याही घातपाताची देखील शंका नाही. ही घटना रविवारी घडली. ”नीलाथ मोहम्मद फिरदौस नाव असलेली ही व्यक्ती दुबईच्या देयरा भागातील इमारतीत वॉचमन म्हणून काम करत होता. १० एप्रिल रोजी तो कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे फिरदोसचे काका नौशाद अली यांनी सांगितले. नंतर तो ७ मे रोजी ठीक झाला आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले.
बाल्कनीत जाऊन मारली ऊडी
मृताच्या नातेवाईकाने सांगितले की, “तो सकाळी प्रार्थना करण्यासाठी उठला, त्यावेळी घरातील सर्वजण नेहमीप्रमाणे रोजच्या कामात व्यस्त होते, मग तो बाल्कनीत गेला आणि तेथून उडी मारली. त्याची मानसिक प्रकृती ठीक नव्हती, काही काळापासून तो अस्वस्थ होता. त्याला भीती वाटायची की कोणीतरी त्याच्यावर हल्ला करेल . काही दिवस त्याने खाणेही बंद केले होते. त्याला वाटत होते की त्याला मारण्यासाठी त्याच्या अन्नामध्ये कोणीतरी विष मिसळले आहे, त्यामुळे तो पाणी पिण्यासही नकार देत होता. ‘
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.