हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसमुळे सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा कणाच मोडलेला आहे. मग ते छोटे शेतकरी असोत किंवा व्यायसायिक, प्रत्येकाचे खूप आर्थिक नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन पेरणी केलेली आहे, त्यांना पिकाची किंमतही मिळत नाही आहे. अशा परिस्थितीत दुसरे कर्ज मिळणे देखील अवघड झाले आहे. तर देशातील बरेच शेतकरी हे आपल्या घरी ठेवलेल्या सोन्यावर बँकेतून लोन घेत आहेत. घरी ठेवलेल्या दागिन्यांवर बँकेतून तुम्हाला त्वरित लोन मिळत आहे.
आता बँकांनी गोल्ड लोन वरील व्याजदरात ४० बेस पॉईंटने घट केलेली आहे. बँका आणि एनबीएफसी सोन्याच्या प्रचलित मूल्याच्या ७५ टक्क्यांपर्यंत लोन देतात, ज्यास एलटीव्ही म्हणतात. स्टेट बँक ऑफ इंडिया वर्षाकाठी ७.७५ % दराने पर्सनल गोल्ड लोन देते (उदाहरणार्थ:१ लाख रुपयांचे कर्जावर ७७५० रुपये व्याज लागते). यासह कर्जाच्या रकमेवर अतिरिक्त प्रक्रिया शुल्क आणि ०.५ टक्के जीएसटीही बँक आकारते.
बँकर्स आणि तज्ञ म्हणतात की, कोरोना विषाणूच्या या साथीमुळे लोनचे पैसे परत मिळण्याची थोडी चिंता आहे. म्हणूनच सोन्यावर सहजपणे लोन दिले जात आहेत. आता बँकासुद्धा गोल्ड लोन देण्यास कचरत नाही आहेत. सध्याच्या काळात बँकांना गोल्ड लोन देणे अधिक सुरक्षित वाटते आहे. क्रेडिट रेटिंग एजन्सी क्रिसिलने असा अंदाज लावला आहे की, यंदाच्या वित्तीय वर्षात साथीच्या आजारामुळे भारताच्या बँकिंग प्रणालीत कर्जाची वाढ कमी झाली आहे आणि कर्जाची वाढ अनेक दशकांच्या पातळीवर गेली आहे.
सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, एचडीएफसी बँक यासह अनेक वित्तीय संस्था या गोल्ड लोनचे वाटप करीत आहेत. एसबीआय सोन्यावर २० लाख रुपयांपर्यंत लोन देत आहे. फेडरल बँकेचे मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) आशुतोष खजुरिया म्हणाले की, आम्ही या क्षणी गोल्ड लोनला प्रोत्साहन देत आहोत आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.