अशा बनावट बँकिंग अ‍ॅपपासून रहा सावध, अन्यथा आपले संपूर्ण खाते होईल रिकामे !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशभरात पसरलेल्या कोरोना साथीच्या काळात सायबर फ्रॉड (Bank Fraud) चे प्रमाणही सतत वाढत आहे. यावेळी लोक बहुतेक सर्व कामांसाठी इंटरनेट वापरत आहेत. त्याचा फायदा हे सायबर गुन्हेगार उठवत आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांनी बनावट आणि बेकायदेशीर अ‍ॅप्सपासून जागरुक राहणे सर्वात महत्वाचे आहे. याकडे आपण लक्ष न दिल्यास, आपल्या खात्यातील सर्व पैसे गायब होऊ शकतात. त्यामध्ये मालवेअर आहे, ज्याचा हेतू बँक डिटेल्सची चोरी करणे आणि आपल्या आजीवन कमाई साफ होऊन जाते.

आपण बनावट बँकिंग अ‍ॅप कसे ओळखू शकता ते जाणून घ्या-

> बनावट अ‍ॅप डाउनलोड करण्यापूर्वी ते वैध आहे की नाही ते तपासा.
> बनावट अ‍ॅप आपल्या मोबाइल फोनची बॅटरी जलद संपवून टाकू शकतो.
> वारंवार बॅटरी कमी होणे हे मालवेअर किंवा व्हायरसमुळे उद्भवू शकते.
> अ‍ॅप डाउनलोड पेज काळजीपूर्वक देखील तपासा.
> फोनमध्ये कोणतीही वेगळी गोष्ट दिसल्यास मोबाईल नेटवर्क प्रोव्हाडरशी संपर्क साधा.

https://t.co/xxdYlP6u8t?amp=1

सर्व वैयक्तिक माहिती लीक होते
हे बनावट अ‍ॅप्स केवळ आपली वैयक्तिक माहितीच चोरत नाहीत तर आपला फोन पूर्णपणे हॅक करतात. जर आपण हे अ‍ॅप्स अ‍ॅक्सिस केले तर आपल्या खात्याची सर्व माहिती फसवणूक करणार्‍यांपर्यंत पोहोचते.

https://t.co/dTTREgx31y?amp=1

ई-मेल व पासवर्डही चोरीला गेले आहेत
बर्‍याच वेळा ते आपल्या पासवर्डची आणि ईमेलविषयीची सर्व माहिती चोरतात. यामुळे आपल्याला आर्थिक त्रास तर होतोच तसेच एसएमएस फॉरवर्ड, कॉल ब्लॉकिंग, बॅटरी लाईफ इत्यादी देखील प्रभावित होतात.

https://t.co/1QpMHjIvqC?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.