हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मंगळवारी प्राप्तिकर विभागाने चिनी कंपन्या आणि त्यांच्या भारतीय सहकारी तसेच अनेक बड्या बँक अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे टाकले. CBDT-Central Board of Direct Taxation ने सांगितले की, तपासणीत असे आढळून आले आहे की, चीनच्या लोकांच्या नावे शेल कंपन्यांमध्ये 40 हून अधिक बँक खाती उघडली गेली आणि आतापर्यंत 1000 कोटींपेक्षा जास्त रुपये या बँक खात्यांमध्ये पाठविले गेलेले आहेत. त्यानुसार हवाला आणि मनी लॉन्ड्रिंगमध्ये काही चिनी नागरिक आणि त्यांचे भारतीय भागीदार गुंतले होते. ते हवालासाठी शेल कंपन्या वापरत होते. या सर्व गोष्टी भारतातल्या चिनी कंपन्यांच्या आवारात चालल्या जात होत्या आणि त्यामध्ये चिनी व्यक्तींचे सहकारी, काही बँक अधिकारी आणि चार्टर्ड अकाउंटेंट यांचा समावेश होता. सीबीडीटीने म्हटले आहे की या परदेशी हवाला व्यवहाराचे पुरावेही सापडले आहेत. याद्वारे अमेरिका आणि हाँगकाँगमध्येही डॉलरचे ट्रांझॅक्शन झाले आहेत.
मंगळवारी प्राप्तिकर विभागाने काही चिनी नागरिक आणि त्यांच्या साथीदारांच्या घरांवर छापेमारीची कारवाई केली. आयकर विभागाला अशी माहिती मिळाली होती की काही चिनी नागरिक त्यांच्या भागीदारांसह मनी लाँडरिंग व हवाला ट्रांझॅक्शन करीत आहेत. या माहितीच्या आधारे, प्राप्तिकर विभागाने चिनी नागरिक, त्यांच्या भागीदार, चीनी कंपन्या आणि काही बँक कर्मचाऱ्यांच्या तळांवर छापे टाकले. प्राप्तिकर विभागाने विविध ठिकाणी छापे टाकण्याची कारवाई केली आहे. असे म्हटले जात आहे की बनावट कंपन्यांच्या आधारे हा हवाला व्यवसाय करीत असलेला हा एक मोठा नेक्सस आहे.
Based on info that few Chinese individuals & their Indian associates were involved in money laundering & hawala transactions through series of shell entities, search action was mounted at various premises of these Chinese entities, their close confederates & bank employees: CBDT pic.twitter.com/DmrrfzkTcL
— ANI (@ANI) August 11, 2020
रिटेल शोरूम उघडण्याच्या नावाने करत होते फसवणूक – चिनी कंपन्या आणि त्यांच्या सहयोगींनीही भारतात रिटेल शोरूम उघडण्याच्या नावाखाली 100 कोटी रुपयांची बनावट अॅडव्हान्स घेतली आहे. काही कागदपत्रेही मिळाली आहेत, त्यातून हवाला आणि मनी लॉन्ड्रिंगच्या या रॅकेटमध्ये काही बँक कर्मचारीही सामील असल्याचे उघड झाले आहे. तपासणी दरम्यान काही चार्टर्ड अकाउंट्सही त्यात सामील असल्याचे आढळून आले आहेत. हाँगकाँगमधून परदेशी हवालाचे ट्रांझॅक्शन आणि अमेरिकन डॉलरचे व्यवहार केल्याचेही उघडकीस आले आहेत.
काही बँक अधिकार्यांच्या घरावरही छापे टाकण्यात आले आहेत. मात्र, या हवाला व्यवसायात गुंतलेल्या कंपन्यांची नावे सीबीडीटीने सध्या गुप्त ठेवली आहेत. सीबीडीटीने आपल्या एका निवेदनात म्हटले आहे की, चिनी लोकांच्या सांगण्यावरून बनावट कंपन्यांच्या नावे 40 हून अधिक बँक खाती उघडली गेली. या बँक खात्यात एक हजार कोटींपेक्षा जास्त रुपये जमा झाले.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in