हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी आरक्षणावरुन सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारल्यानंतर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकार व राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. “आजच्या कोर्टाच्या निकालामुळे या सरकारच्या नौटंकीचा पर्दाफाश झाले आहे. वेळ असताना जर आयोगाला बसायला खुर्ची दिली असती, मानधन दिले असते तर आज हि वेळ आली नसती. जो पेयांत शकुनी काकांच्या इशाऱ्यावर प्रस्थापितांचे सरकार चालत्या तोपर्यंत असेच नाटक चालणार आहे, अशी घणाघाती टीका पडळकरांनी केली.
आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाती सरकावर ट्विट करीत हल्लाबोल केला. त्यांनी ट्विटद्वारे म्हंटले की, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले होते की, अध्यादेश काढण्यापूर्वी इंपेरीकल डेटा गोळा करा, मगच अध्यादेश काढा. पण या महाविकास आघाडी सरकारमधील प्रस्थापितांनी आपल्या उमेदवारांसाठी मार्ग मोकळा करायचा होता. जोपर्यंत शकुनी काकांच्या इशाऱ्यावर हे प्रस्तापितांचे सरकार चालत आहे. तोपर्यंत असेच हे नाटक चालणार आहे.
मा.देवेंद्र फडणवीस जी यांनी स्पष्ट सांगितले होते की,अध्यादेश काढण्यापूर्वी इंपेरीकल डेटा गोळा करा,मगच अध्यादेश काढा.पण प्रस्थापितांना आपल्या उमेदवारांसाठी मार्ग मोकळा करायचा होता. जोपर्यंत शकुनी काकांच्या इशाऱ्यावर हे pic.twitter.com/mNxakyPIuj
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) December 15, 2021
गेली दोन वर्ष फक्त केंद्राकडे बोट दाखवण्याचे काम केले आहे. या दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारने खरंच ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न केले असते आज ओबीसी आरक्षण गमावण्याची वेळ आली नसती. त्यामुळे नागरिकांनी आता आपल्या हक्कासाठी या सरकारला जाब विचाराचा, असे पडळकर यांनी सांगितले.