हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत भावजीच्या घरी पाळत ठेवुन मेहुण्याने त्याच्या दोघा साथीदाराच्या मदतीने 70 हजारांची चोरी केली होती. तीन महिन्यांनी या चोरीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीसांना यश आले. निर्मलकुमार ऊर्फ बबन बापुसो गायकवाड आणि दिपक बाळासाहेब पाटील या दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सांगलीचे आमदार गाडगीळ यांचे स्वीय सहाय्यक असलेले अमोल बबन कणसे यांच्या घरामध्ये १३ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बंद घराचे कुलुप तोडून घरातून रोख ७० हजार रुपये चोरीला गेले होते. या बाबत विश्रामबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी विश्रामबाग पोलीस ठाणेच्या हदीतील एक खास पथक तयार केले, हे पथक रेकॉर्डवरील आरोपी चेक करीत घरफोडीच्या गुन्हयाची माहिती घेत असताना पोलीस कॉन्स्टेबल आर्यन देशिंगकर यांना त्याचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, अमोल कणसे याचे घरी झालेली घरफोडी ही त्याचा मेव्हणा निर्मलकुमार गायकवाड आणि त्याचा मित्र दिपक पाटील यांनी केली आहे. मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकाने डॉ चिवटे हॉस्पिटलजवळ मिरज येथुन दोघानां ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता अमोल बबन कणसे याचे घरीतील कपाटात पैसे असल्याचे मेहुणा निर्मलकुमार यास माहिती होती.
निर्मलकुमार आणि त्याचा साथीदार दीपक पाटील या दोघांनी भाऊजीच्या घरी चोरी करण्याचे ठरवून रंगपंचमी दिवशी भाऊजीचे घरात कोणी नसल्याचे पाहून, अमोल कणसे यांच्या घराचे कुलुप दिपकने आणलेल्या लोखंडी कटावणीने तोडून घरात जावून घरातील कपाटातील रोख ७० हजार रुपये चोरले असल्याची कबुली दोघानी दिली आहे. या दोघांच्या अंगझडती मध्ये चोरीस गेलेली रोख रक्कम ७० हजार रुपये मिळुन आले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.