Tuesday, June 6, 2023

सुशांत सिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी? सुब्रमण्यम स्वामी यांनी नेमला वकील

नवी दिल्ली | बाॅलिवुड अभिनेता सुशांतसिंग राजपूतने 14 जून रोजी मुंबईच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिस प्रत्येक गोष्टींचा शोध घेत असून आतापर्यंत 32 हून अधिक जणांची निवेदने नोंदली आहेत. दुसरीकडे सोशल मीडियावरील चाहते सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. या प्रकरणातील ताजी माहिती अशी आहे की सुब्रमण्यम स्वामी यांनी सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात सीबीआय चौकशीसाठी वकील नेमला आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट केले की, सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात मी सीबीआय चौकशी किंवा पीआयएल किंवा फौजदारी तक्रारीची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले. तसेच सुशांतच्या आत्महत्येस IPC चे कलम 306 आणि 308 लागू होतेय का याचा अभ्यास सुरु असून लवकरच याबाबत माहिती मिळेल असंही सुब्ह्रमन्यम यांनी सांगितले आहे.

इशकरन सिंग भंडारी संभाव्य सीबीआय चौकशी किंवा पीआयएल किंवा गुन्हेगारी तक्रारीच्या प्रकरणातील सर्व डेटा गोळा करतील असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे. त्याच वेळी, ट्विटर वर सध्या #CBIForSonOfBihar ट्रेंड होतोय. सोशल मीडियावरील चाहते सुद्धा सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.