केंद्र सरकारने लॉन्च केली जगातील सर्वात स्वस्त Corona Testing Kit, आता किती रुपये लागतील जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या जगभरातील अनेक देश हे त्यांच्या पातळीवर कोरोनाविरूद्ध लढा देत आहेत. आतापर्यंत कोरोनाव्हायरसमुळे लाखो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अजूनही कोरोना हा संपूर्ण जगासाठी अडचणीचे एक कारण ठरत आहे. या विषाणूची तपासणी करण्यासाठी बनविलेल्या टेस्टिंग किट्सची किंमतही जास्त आहे, यामुळे जास्तीत जास्त टेस्टिंग होत नाही आहे. या चाचणीचा दर हा भारतातील सर्वसामान्य लोकांना परवडणारा नाही. त्याची जास्त किंमत लक्षात घेऊन केंद्र सरकारने आज एक स्वस्त कोरोना टेस्टिंग किट बाजारात आणली आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयल निशंक आणि मनुष्यबळ विभाग राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी आज जगातील या सर्वात स्वस्त असलेल्या कोरोना टेस्टिंग किटचे लॉंचिंग केले. दिल्ली आयआयटीने हे सर्वात स्वस्त कोरोना टेस्टिंग किट बनविले आहे. या कार्यक्रमादरम्यान, कॉरटेनिंग चे व्यवस्थापकीय संचालक जतिन गोयल म्हणाले की,’ या किटची किंमत सुमारे 650 रुपयांच्या आसपास असू शकते.

‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार न्यूटेक मेडिकल कंपनी हे किट बाजारात उपलब्ध करुन देणार आहे. या किटचे नाव ‘क्योरश्योर’ असे असेल. या क्योरश्योरमुळे, देशात कोरोना टेस्टिंग करण्याच्या पद्धतीमध्ये मोठा बदल होईल. यानंतर, टेस्टिंगची संख्या आणि किंमतींमध्ये फरक दिसून येईल.

 

दिल्ली आयआयटीचे संचालक व्ही रामगोपाल राव म्हणाले की, न्यूटेक मेडिकल कंपनी ही आयआयटी दिल्लीचे हे तंत्रज्ञान वापरेल. याच्या स्वस्त दरांमुळे एका महिन्यात सुमारे 20 लाख चाचण्या करणे आता शक्य होणार आहे. आयसीएमआर आणि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने या किटला परवानगी देखील दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.