शाळा सुरु करण्यासंदर्भात चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले कि…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय काल ठाकरे सरकारच्या वतीने घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुण्यात शाळा सुरु करण्या बाबत बैठक घेतली जाणार आहे. यावरून आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवार यांना सल्ला दिला आहे. “कोरोनाची रुग्णासंख्या वाढत असली तरी शहरातील शाळा सुरु कराव्या लागणार आहेत. त्यासाठी आठवड्यातून एक दिवस शाळा, ज्या वर्गात 40 विद्यार्थी संख्या आहे तिथे 10 विद्यार्थ्यांना बोलवावे, असे म्हणत पाटील यांनी पवारांना सल्ला दिला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पुणे या ठिकाणी कोरोनाचे प्रमाण वाढत आहेत. अशा परिस्थितीत शाळा या सुरु कराव्या लागणार आहेत. ज्या वर्गात 40 विद्यार्थी संख्या आहे. त्या वर्गात 10 विद्यार्थ्यांना बोलवावे. अजित पवार यांच्याशी चर्चा करून त्यांनी पुण्यात शाळा सुरु करण्यासंदर्भात लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती करणार आहे.

पुण्यात शाळा सुरु करायच्या असतील तर काही गोष्टीचा विचार हा करावा लागणार आहे. त्यासाठी आठवड्यातून एक दिवस शाळा, विद्यार्थ्यांचे स्लॉट पाडणे, ज्या वर्गात 40 विद्यार्थी संख्या आहे तिथे 10 विद्यार्थ्यांना बोलवावे, अशा प्रकारच्या गोष्टींचा अवलंब करावा, असा सल्ला यावेळी पाटील यांनी दिला.