पंतप्रधान किसान सन्मान योजनेत बदल; आता २ करोड पेक्षा जास्तशेतकऱ्यांच्या खात्यावर येणार ६ हजार रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही गेल्या वर्षी जाहीर करण्यात आली होती. या योजनेंतर्गत केंद्र सरकार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करते. या योजनेंतर्गतचा पुढील हप्ता हा १ ऑगस्ट २०२० पासून शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केला जाईल. त्याच वेळी या योजनेत नुकताच एक मोठा बदल केलेला आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी याबाबत म्हणाले की, आता या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून यातून आणखी २ कोटी शेतकर्‍यांना ६००० रुपये मिळतील.

हा नियम बदलल्याने आणखी २ कोटी शेतकर्‍यांना फायदा होईल – कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांचे म्हणणे आहे की,२ हेक्टर क्षेत्र शेती असण्याचे बंधन आता संपुष्टात आले आहे. आता सर्वच शेतजमीन धारक शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. या दुरुस्तीचा फायदा आणखी २ कोटी शेतकर्‍यांना होईल.

ही केंद्र सरकारची एक योजना आहे, १ फेब्रुवारी २०१९ रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात याबाबत घोषणा केली गेली होती. या योजनेअंतर्गत सर्वच लहान तसेच सीमांत शेतकरी कुटुंबांना यापूर्वी ६००० रुपये देण्यात येत होते. या योजनेचा लाभ अशा शेतकरी कुटुंबांना मिळतो, ज्यांची एकूण जमीन हि २ हेक्टर पर्यंत होती. आता हे बंधन पूर्णपणे काढून टाकलेले आहे. २०००-२००० रुपयांच्या तीन हप्त्यात शेतकर्‍यांना हे पैसे दिले जातात. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) अंतर्गत हे पैसे थेट शेतकर्‍यांच्या खात्यात ट्रान्सफर केले जातात. डीबीटीकडून पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया पारदर्शक आहे. तसेच, शेतकर्‍यांचाही बराच वेळ वाचतो.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पुढील हप्ता १ ऑगस्टला येईल. या योजनेत नोंदणी झाली असूनही जर शेतकर्‍यांच्या खात्यात २००० रुपयांचा हप्ता जमा होत नसेल तर आपण घरी बसूनच आपल्या त्याच्या अर्जाची स्थिती तपासू शकता.

त्यासाठी पंतप्रधान किसान वेबसाइट pmkisan.gov.in वर भेट द्या. त्यानंतर मेन पेज वरील मेनू बार पहा आणि येथे ‘फार्मर्स कॉर्नर’ वर जा. येथे BeneficiaryStatusवर क्लिक करा. आता या पेजवर आपल्याला आपल्या फॉर्मची सध्याची स्थिती जाणून घेण्यासाठी ३ पर्याय दिसतील.

आधार क्रमांक, खाते क्रमांक आणि मोबाइल नंबर. यापैकी कोणत्याही एकावर क्लिक करा किंवा टॅप करा. आता तुम्ही निवडलेल्या ऑप्शनमध्ये नंबर टाका आणि Get Data वर क्लिक करा. आता आपल्याला आपल्या फॉर्मची सध्याची स्थिती दिसेल.

जर आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी याआधीच अर्ज केला असेल आणि आता तुम्हाला लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आपले नाव पहायचे असेल तर तुमच्यासाठी आता सरकारने ही सुविधा ऑनलाईन देखील पुरविली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना २०२० ची नवीन यादी अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर तपासली जाऊ शकते.

आपले नाव यादीमध्ये पहा- प्रधान मंत्री किसन सन्मान निधी योजना
येथे ‘लाभार्थी सूची’ लिंकवर क्लिक करा. त्यानंतर आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा, गट आणि गाव तपशील भरा, हे भरल्यानंतर, Get Report वर क्लिक करा व संपूर्ण यादी मिळवा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.