कोरोना काळात गेल्या 6 महिन्यात चिनी लोकांनी भरपूर खाल्ला भारतीय गूळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना-लॉकडाउन दरम्यान शरीराची प्रतिकारशक्ती कशी वाढवायची याबद्दल जोरदार चर्चा सुरू होती. कधी काढ़ा पिण्याचा सल्ला दिला जात होता तर कधी सुकामेवा व इतर गोष्टी खाऊन प्रतिकारशक्ती वाढवण्याचा सल्ला देण्यात येत होता. दरम्यान, आपला शेजारील देश चीन (China) भारतातून गुळाची (Jaggery) खरेदी करीत होता. एप्रिल ते सप्टेंबर 2020 पर्यंत चीनने संधी मिळेल तेव्हा बराच गूळ मागविला. गुजरात, महाराष्ट्र आणि तेलंगणा येथून चीनमध्ये गूळ पाठविण्यात आले. सन 2019 च्या तुलनेत यावर्षी चीनने मोठया प्रमाणात गुळाची खरेदी केली आहे.

चीनने गेल्या 6 महिन्यांत 2404 मेट्रिक टन गूळ खाल्ला
एक्सपोर्ट अथॉरिटीच्या आकडेवारीकडे पाहता, एप्रिल-सप्टेंबरमध्ये भारताकडून चीनला गूळ पुरविला जात होता, तेव्हा तेथे कोरोना साथीचा प्रादुर्भाव होता आणि तेथे लॉकडाउन होते. यावेळी, सर्वाधिक 1583 मेट्रिक टन गूळ गुजरातमधून पाठविला गेला. यानंतर महाराष्ट्रातून 819.46 मेट्रिक टन गूळ तर तेलंगणाहून चीनला सुमारे 2 मेट्रिक टन गूळ पाठविण्यात आले. अशाप्रकारे, चीनने भारताकडून अवघ्या 6 महिन्यांत 2404 मेट्रिक टन गूळ विकत घेतला. त्याची किंमत 9.22 लाख अमेरिकन डॉलर्स होती.

https://t.co/5qXtwbOlUa?amp=1

कोरोनादरम्यान गुळाची जास्त खरेदी केली
अथॉरिटीच्या आकडेवारीनुसार चीनने कोरोनादरम्यान सर्वाधिक गूळ विकत घेतला आहे. सन 2019-2020 च्या 12 महिन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास चीनने भारताकडून केवळ 63 मेट्रिक टन गूळ विकत घेतला होता. म्हणजेच कोरोनाच्या वेळी अधिक गूळ विकत घेतला आहे. यावेळी गूळापासून बनवलेल्या काही वस्तू चीनमध्येही पुरविल्या गेल्या. गूळ तज्ज्ञ आणि देशातील सर्वात मोठी शामली गुळाच्या बाजाराचे कव्हर करणारे ज्येष्ठ पत्रकार पंकज मलिक सांगतात की, आता गुळाचा व्यवसाय पूर्वीसारखा राहिला नाही.

https://t.co/lpE03lgE0d?amp=1

पूर्वी कधी खेड्यापाड्यात आणि किराणा दुकानात मिळणारा गूळ आता परदेशापासून ते मॉलपर्यंत पोहोचला आहे. केवळ चीनमध्येच नाही तर अन्य देशांमध्येही 250 ग्रॅमच्या पॅकपासून ते 1 किलो पॅकपर्यंत गूळ निर्यात होत आहे. वेस्ट यूपीमध्ये अनेक पॅकेजिंग युनिट्स बसविण्यात आली आहेत.

https://t.co/3BnBLFMKfh?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment