फक्त ५ दिवसांत कोरोना होणार बरा; रामदेव बाबांचे कोरोनावरील औषध लाँच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशभरात आणि जगभरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होतो आहे. अनेक शास्त्रज्ञ यावर औषध शोधण्यासाठी दिवसरात्र एक करून काम करत आहेत. जगभरात यावर काम सुरु आहे. मात्र अद्याप कुणाला यश आलेले दिसत नाही आहे. आता रामदेव बाबा यांच्या पतंजलीने यावर औषध शोधले असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. योगगुरू रामदेव बाबा यांनी कोरोनावरील या औषधाला कोरोनिल असे नाव दिले आहे. आज हे औषध ते जगासमोर आणणार आहेत.

पतंजलीने कोरोनावरील औषध शोधले असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. आचार्य बालकृष्ण हे आज हरिद्वारच्या पतंजली योगपीठात कोरोनाचे हे आयुर्वेदिक औषध लॉन्च करणार आहेत. मोठ्या प्रमाणात संशोधन सुरु असतानादेखील अद्याप लस सापडलेली नाही म्हणून या औषधाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या औषधाच्या लॉन्चिंग ला रामदेव बाबाही उपस्थित राहणार आहेत.

सध्या या औषधाचं उत्पादन हरिद्वारमधील दिव्य फार्मसी आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड करत आहेत. दरम्यान, पतंजलीला मिळालेल्या परवानगीनंतर या औषधाची वैद्यकीय चाचणी इंदूर आणि जयपूरमध्ये करण्यात आली होती. करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर पतंजलीची एक टीम यावर संशोधन करत होती, अशी माहिती बालकृष्ण यांनी दिली. याव्यतिरिक्त अनेक करोनाबाधितांवर या औषधाची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. तसंच यामध्ये १०० टक्के यश मिळाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. करोनील हे औषध करोनाबाधितांना ५ ते १४ दिवसांमध्ये बरं करू शकतं असा दावाही बालकृष्ण यांनी केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.