भारत पुन्हा ‘डेंजर झोन’मध्ये ? नोमुराचा अहवाल; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाचा वाढत प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु करण्यात आलेला होता, ज्यामध्ये आता हळहळू शिथिलता आणली जात आहे, मात्र असे असले तरी कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढच होताना दिसते आहे ज्यामुळे सरकारच्या चिंतेत भर पडत चालली आहे. त्यामुळे लॉकडाउन शिथिल करण्याचा घेतलेला हा निर्णय हानिकारक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका संस्थेनं नुकत्याच केलेल्या अभ्यासातून भारताच्या चिंतेत भर टाकणारे असे काही निष्कर्ष समोर आले आहे. जपान मध्ये असलेल्या सुरक्षेसंबंधित नोमुरा या संस्थेने कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर जगभरातील एकूण ४५ देशांच्या अर्थव्यवस्थांचा अभ्यास केला आहे. ज्यामध्ये भारत हा ‘डेंजर झोन’मध्ये असल्याचं त्यांनी सांगितले आहे. भारतात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली असून, भारतात पुन्हा एकदा लॉकडाउन लागू शकतो, असं नोमुरानं म्हटलं आहे.

भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारकडून लगेचच लॉकडाउन सुरु करण्यात आलेला होता. सुमारे अडीच महिन्यांच्या या कालावधीनंतर आता संपूर्ण देशातून हळूहळू लॉकडाउन शिथिल करण्यात येत आहे. मात्र हळूहळू सामान्य जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाथीचे हे प्रयत्न सुरू असतानाच जपानमधील नोमुरा या संस्थेनं केलेल्या या अभ्यासानं भारताच्या चिंतेत भर पडली आहे. नोमुरानं आपल्या या संशोधनात जगातील सर्वात मोठ्या ४५ अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांची श्रेणी निहाय विभागणी केली आहे. यात पहिली श्रेणी ऑन ट्रॅक, दुसरी वॉर्निंग साइन आणि तिसरी डेंजर झोन अशी वर्गवारी करण्यात आली आहे. नोमुरानं केलेल्या या अभ्यासानुसार लॉकडाउन हटवल्याने अनेक देशांमध्ये दोन प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते असे सांगण्यात आलेले आहे.

पहिली स्थिती : पहिली स्थती जे कि एक चांगला संकेत दर्शवते. लॉकडाउनला हटवल्यानंतर लोकांचे कोरोनाच्या संसर्गातून बरे होण्याचे प्रमाण वाढेल तसेच दररोज काही प्रमाणात रुग्णांची संख्या वाढूही शकते. मात्र, लोकांची याबाबतची भीतीही कमी होईल. त्यामुळे व्यवसाय सुरू होतील आणि सामान्य जनजीवन पूर्वपदावर येण्यास होईल. जसंजसे रुग्णांची संख्या कमी होत जाईल, तसतसे याचे सकारात्मक परिणामही दिसून येतील.

दुसरी स्थिती : या स्थितीमध्ये वाईट परिणाम दिऊ शकतील. यामध्ये लॉकडाऊन हटवून अर्थव्यवस्थेला चालना देतानाच कोरोनाचे संक्रमण वाढतच जाईल. त्याचबरोबर कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्याही वाढतच जाईल. यामुळे लोकांच्या मनात भीतीही वाढेल आणि जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत होईल. यामध्ये अत्यंत अंत्यत गंभीर स्थिती झाल्यामुळे कदाचित लॉकडाउन पुन्हा एकदा लादला जाऊ शकतो, असा निष्कर्ष नोमुराच्या या अभ्यासात मांडण्यात आला आहे.

डेंजर झोन म्हणजे नेमकं काय ते जाणून घेउयात
नोमुरानं केलेल्या अभ्यासात डेंजर झोनमधील देशांची एक वेगळी लिस्ट तयार करण्यात आलेली आहे. यात भारतासह पाकिस्तान, सौदी अरेबिया, कोलंबिया, ब्राझील, सिंगापूर, इंडोनेशिया, मेक्सिको, कॅनडा, अर्जेटिंना, दक्षिण आफ्रिका, चिली, स्वीडन आणि इक्वाडोर या देशांचा समावेश करण्यात आलेला आहे. या देशांमध्ये कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ज्यामुळे येथील परिस्थिती ही अधिकच चिंताजनक होऊन लॉकडाउन पुन्हा लागू करण्याची स्थिती उद्भवू शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment