हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या जगभरात वर्णद्वेषाचा मुद्दा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत एका कृष्णवर्णियाच्या मृत्यूनंतर यावर जगभरातून तीव्र विरोध आहे, तसंच उर्वरित जगातून याविषयी आवाज उठत आहेत. क्रीडा जगतातले अनेक दिग्ग्जही त्याला विरोध करत आहेत. कॅरेबियन खेळाडू ख्रिस गेल आणि त्यानंतर वेस्ट इंडीजचा टी -२० विश्वचषक विजेता कर्णधार डॅरेन सॅमीने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मंगळवारी बोलताना त्याने आयसीसीला सांगितले की, ‘क्रिकेट जगाने एकतर वर्णभेदाविरोधात आवाज उठवावा की समस्येचा एक भाग आहेत असे म्हणण्यास सज्ज व्हा.
अमेरिकेत आफ्रिकन-अमेरिकन जॉर्ज फ्लॉयड याच्या निधनानंतर सॅमीने हे विधान केले आहे. एका श्वेतवर्णीय पोलिस अधिकाऱ्याने फ्लॉईडच्या मानेवर गुडघे ठेवला आणि त्याला ठार मारले. त्यानंतर अमेरिकेत अनेक ठिकाणी हिंसक आंदोलने सुरू झालेली आहे.
सॅमीने सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये कृष्णवर्णियाच्या समस्यांबद्दल लिहिले. त्याने ट्वीट केले की,’ हा नवीन व्हिडिओ पाहिल्यानंतर, जर क्रिकेट जगत अश्वेतांवर होणाऱ्या या अन्यायाविरूद्ध उभे राहिले नाही तर तेही या समस्येचा भाग मानले जाईल. सॅमी म्हणाला की,’ वंशविदाचा सामना केवळ अमेरिकेतच नाही तर जगभरात केला जातो. त्याने असा प्रश्न केला की,’ माझ्यासारख्या लोकांचे काय होते आयसीसी आणि इतरही क्रिकेट बोर्ड याकडे पाहत नाहीत. माझ्यासारख्या लोकांवर हा सामाजिक अन्याय होत नाही का. ते म्हणाले की, ‘ हे फक्त अमेरिकेतच नाही होत तर हे दररोजच घडत असते.
आता गप्प बसण्याची ही वेळ नाही. मला तुमचा आवाज ऐकायचा आहे. सॅमी म्हणाला की,’ काळे लोकं बर्याच काळापासून हे सहन करीत आहेत. मी सेंट लुसियात आहे आणि जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूबद्दल मला खेद आहे. आपण बदल आणण्यासाठी आपले समर्थन देखील देताय का? हॅशटॅग ब्लॅक लाइव्ह्स मॅटर.’
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.