‘विराट आणि रोहित यांच्यात ‘हा’ आहे सर्वोत्कृष्ट खेळाडू’- ब्रॅड हॉग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा हे दोघे सध्या जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक मानले जातात. दोन्ही क्रिकेटर्सनी गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी केली असून अनेक मोठे विक्रमही केलेले आहेत. एकीकडे विराट कोहलीने आपल्या स्फोटक खेळाने (४२ एकदिवसीय सामने, २७ कसोटी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ७० शतके ठोकली आहेत आणि सचिन तेंडुलकरच्या १०० आंतरराष्ट्रीय शतकांच्या विक्रमाजवळ आला आहे.

तर, दुसरीकडे सलामीवीर फलंदाज रोहित शर्माही मर्यादित षटकांतील खेळांत जगातील सर्वात विश्वासार्ह खेळाडूंपैकी एक बनला आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात रोहित असा पहिला फलंदाज आहे की, ज्याने एक-दोन नव्हे तर तब्ब्ल तीन दुहेरी शतके ठोकली आहेत. अशा परिस्थितीत रोहितने लवकरच चौथ्यांदा वनडेमध्ये डबल सेंच्युरी करावी अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांकडून केली जात आहे. केवळ चाहतेच नाही तर ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज ब्रॅड हॉगचाही असा विश्वास आहे की,रोहित शर्मा हा एकमेव असा फलंदाज आहे जो वन डेनंतर टी -२० स्वरूपातही दुहेरी शतक ठोकू शकतो.

मात्र, एवढी चांगली कामगिरी करूनही चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे की,विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यापैकी मर्यादित षटकांतील सामन्यांत सर्वोत्कृष्ट फलंदाज कोण आहे. त्याच प्रश्नाला उत्तर देताना हॉगने आपल्या युट्यूब चॅनेलवर सांगितले की,’ विराट आणि रोहितमध्ये सर्वोत्कृष्ट कोण आहे. तो म्हणाला की, “विराट कोहलीकडे सातत्य आहे, विशेषत: जेव्हा भारत धावांचा पाठलाग करत असतो तेव्हा तो विरोधी संघासमोर अगदी पर्वतासारखा उभा असतो.”

Virat Kohli vs Rohit Sharma: How do the two modern era ODI greats ...

तर दुसरीकडे हॉगने या दोन्ही खेळाडूंचा स्वभाव पूर्णपणे भिन्न असल्याचेही म्हटले तो म्हणाला की,’ या दोघांमध्ये बराच फरक आहे तसेच दोघांचीही खेळाची खेळण्याची शैलीही एकमेकांपेक्षा वेगळी आहे.हॉग पुढे म्हणाला, “या दोघांमध्ये तशी तुलना करता येणार नाही. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे दोघांच्याही भूमिका वेगवेगळ्या आहेत. नव्या चेंडूवर आक्रमक फलंदाजी करण्याची जबाबदारी रोहितची आहे तर डाव पुढे नेण्याची आणि शेवटपर्यंत क्रीजवर राहण्याची जबाबदारी ही विराटची आहे. अशा परिस्थितीत हे दोन्ही खेळाडू एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. ”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment