श्रीशांतने निवडला आपला आवडता भारतीय टी -20 संघ, स्वतः सहित केला धोनी आणि रैनाचा देखील समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या 9 वर्षांपासून टीम इंडियाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज एस श्रीशांतचे नाव टी -20 मध्ये पाहायला मिळत आहे. या संघाचा कर्णधार रोहित शर्मा असून सुरेश रैना आणि एमएस धोनी यांनाही या भारतीय टी -20 संघात स्थान मिळालं आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, मात्र तुम्हांला आम्ही हे सांगू की या संघाला वेगवान गोलंदाज एस श्रीशांतने स्वत: निवडले आहे. एस श्रीशांतने एका खासगी वाहिनीशी झालेल्या विशेष संभाषणात आपला सर्वोत्कृष्ट टी -20 संघ निवडला, ज्यात त्याने स्वत: ला सामील केले. इतकेच नाही तर त्याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला निवडले नाही.

श्रीशांतने स्वत: ला या टी -20 संघात स्थान दिले
एस श्रीशांतने स्वत: ची या भारताच्या टी -20 संघात निवड केली आहे. श्रीशांतला वाटते की अजूनही त्यांच्यामध्ये भारताकडून खेळण्याची ताकद आहे. श्रीशांतने भारताकडून 27 कसोटी सामन्यांत 87 बळी घेतले आहेत. तसेच, 53 एकदिवसीय सामन्यात त्याने 75 बळी घेतले आहेत. श्रीशांत 2007 टी -20 विश्वचषक आणि 2011 चा वर्ल्ड कप जिंकणार्‍या टीम इंडियाचा एक भाग होता. मात्र, 2013 मध्ये जेव्हा आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये त्याला अटक करण्यात आली तेव्हा बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन बंदी घातल्यानंतर त्याची कारकीर्द पूर्णपणे बदलली. मात्र, यानंतर कोर्टाने त्याला निर्दोष घोषित केले आणि त्याच्यवर 7 वर्षांची बंदी घालण्यात आली. श्रीशांत आता 13 सप्टेंबर 2020 पासून क्रिकेटमध्ये परतू शकतो.

श्रीशांतने धोनी आणि रैनाची निवड केली
एकीकडे जिथे टीम इंडियाचे सेलेक्टर्स मानत आहे कि धोनी आणि रैना संपल्यात जमा आहेत तिथे श्रीशांतला वाटते की या दोन क्रिकेटर्समध्ये अजून बरेच क्रिकेट बाकी आहे. श्रीसंत म्हणाला की, तो आजही रैना आणि धोनीवर बाजी लावू शकतो. श्रीशांतने यावेळी सलामीवीर म्हणून धवन आणि रोहित शर्माची निवड केली आणि टी -20 चे कर्णधारपद हे हिटमनकडे सोपवले. श्रीशांतचा असा विश्वास आहे की विराट एकदिवसीय आणि कसोटीचे स्वरूप योग्यरितीने हाताळू शकेल पण रोहित शर्मा टी -20 मध्ये एक गजब कर्णधार आहे. श्रीशांतने हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा या दोघांनाही आपल्या संघात संधी दिली आहे.

श्रीशांतच्या भारतीय संघातील अकरा खेळाडू – रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, केएल राहुल, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि श्रीशांत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.