शोएब अख्तरकडून आफ्रिदीची थट्टा, पहा मजेशीर व्हिडिओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर वेगवान गोलंदाजीमुळे जसा परिचित आहे तसाच तो आपल्या हजरजबाबीपणासाठी सुद्धा ओळखला जातो. अलीकडेच त्याचा माजी सहकारी खेळाडू असलेला शाहिद आफ्रिदी हा त्याच्या या हजरजबाबीपणाचा बळी ठरला. अख्तरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो आफ्रिदीची थट्टा करत असल्याचे दिसून येते आहे.

शोएबने आफ्रिदीला केले ट्रोल
शोएब अख्तर या व्हिडिओमध्ये काही मुलांना विचारतो की, ‘ते मोठेपाणी कोण होऊ इच्छितात. शोएब एका मुलाला आपल्या जवळ बोलावतो आणि विचारतो की,’ जेव्हा तो मोठा होईल तेव्हा त्याला काय व्हायचे आहे, तेव्हा मुलाने उत्तर दिले की,’ त्याला आफ्रिदी बनायचे आहे.’ त्या मुलाचे हे उत्तर ऐकून शोएब अख्तर हसला आणि म्हणाला , ‘मग तू लवकरच आउट होशील.’ शाहिद आफ्रिदी आपल्या क्रिकेट कारकीर्दीत स्वस्तात बाद होण्यासाठी प्रसिध्द होता. वाकडे तिकडे शॉट्स खेळून आउट झाल्यामुळे त्याची बरीच बदनामी देखील झाली. शोएब अख्तरने दिलेले हे गमतीदार उत्तर सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

आफ्रिदी आपल्या वक्तव्यांबद्दल चर्चेत आहे
काही दिवसांपूर्वी आफ्रिदीने पीओकेमध्ये पंतप्रधान मोदींबद्दल वादग्रस्त विधान केले होते. मात्र पंतप्रधान मोदींवर वादग्रस्त विधान केल्यानंतर युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांनी या पाकिस्तानी क्रिकेटपटूशी असलेले सर्व संबंध तोडण्याविषयी सांगितले. कोरोना विषाणूची लागण झालेल्यांच्या मदतीसाठी निधी जमा करण्यास शाहिद आफ्रिदीच्या फाऊंडेशनला मदत करण्याचे दोन्ही क्रिकेटपटूंनी आवाहन केले होते. युवराज आणि हरभजनच्या संबंध तोडण्याविषयी आफ्रिदी म्हणाला होता, ‘युवी आणि भज्जीने आपल्या फाऊंडेशनच्या मदतीसाठी जे केले त्याबद्दल त्याचे आभार. पण खरा मुद्दा असा आहे की ते लोक तिथे रहात आहेत. ते असहाय्य आहेत आणि त्यांना हे ही चांगले ठाऊक आहे कि त्यांच्यावर अत्याचार होत आहे.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.