म्हणूनच गावस्करांनी आपल्या मुलाला वेस्ट इंडिजच्या ‘या’ महान खेळाडूचे नाव दिले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकेकाळी मैदानावर वेस्ट इंडिज संघाकडून क्रिकेट खेळलेला भारतीय वंशाच्या रोहन कन्हाईने कॅरेबियन संघाकडून ७९ कसोटी, ७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. आपल्या १७ वर्षांच्या कारकीर्दीत त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ६ हजार २२७ धावा केल्या. त्याने एकूण १५ शतके तसेच २८ अर्धशतके केली. गावस्कर हे रोहन कन्हाईचे इतके चाहते होते की त्यांनी आपल्या मुलाचे नावही त्यांच्या नावावर ठेवले.

आता ४४ वर्षानंतर सुनील गावस्कर यांनी आपल्या मुलाला या कॅरिबियन दिग्गजाचे नाव देण्यामागील कारण सांगितले आहे. रोहन कन्हईने गावस्कर याना कॅरेबियन भूमीवर उत्तम कामगिरी करण्यास प्रेरित केले. रोहन गावस्कर याचा जन्म २० फेब्रुवारी १९७६ रोजी कानपूर येथे झाला होता. त्याने भारताकडून ११ एकदिवसीय सामने खेळले आहेत. ११ एकदिवसीय सामन्यात रोहनने १५१ धावा केल्या आणि १ विकेट घेतला.

एका कार्यक्रमात बोलताना सुनील गावस्कर यांनी आपल्या कारकीर्दीत एका फलंदाजाद्वारे आपण प्रेरित असल्याचे उघड केले. तो त्या दिग्‍गजामुळे इतका प्रेरित झाला होता की, त्याने आपल्या मुलाचे नाव त्याच्याच नावावरून ठेवले. गावस्कर यांनी याबाबत खुलासा केला की, जेव्हा तो फलंदाजी करीत होता तेव्हा रोहन त्याच्या कानात बोलून त्याला शतकी खेळी करण्यास प्रोत्साहित करत असे.

१९७१ ची मालिका आठवताना गावस्कर म्हणाले की,’ जेव्हा त्याने मालिकेतील एका सामन्यात खराब शॉट खेळला तेव्हा त्यावेळी रोहन त्याच्याकडे आला आणि कानात म्हणाला की, तुला शतकी खेळी करायची नाहीये का ?. ओव्हर संपल्यावर रोहन पुढच्या षटकात स्लिपच्या दिशेने जाताना आपल्याला फलंदाजीकडे लक्ष देण्यास सांगायचा. तूला शतक बनवायचे नाहीये का? तुझं काय चुकतय ? गावसकर म्हणाले की, रोहन विरोधी संघात होता, मात्र त्यावेळी त्याने कधीही मला टोमणे मारले नाहीत. मी फक्त शतक झळकवावे ही त्याची इच्छा होती. त्या संपूर्ण मालिकेत गावस्करने तीन शतके आणि एक दुहेरी शतक झळकावले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.