हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १९७५ मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची सुरूवात जरी वेस्ट इंडीजने विश्वचषक जिंकून झाली असली तरी ऑस्ट्रेलियाने आतापर्यंतच्या एकूण ११ विश्वचषकांपैकी ५ जिंकून या संपूर्ण स्पर्धेवर आपले वर्चस्व गाजवले आहे. ऑस्ट्रेलियाने १९८७ मध्ये अॅलन बॉर्डरच्या नेतृत्वाखाली पहिला विश्वचषक जिंकला, त्यानंतर १९९९ मध्ये स्टीव्ह वॉ, २००३ आणि २००७ मध्ये रिकी पॉन्टिंग, तर २०१५ मध्ये मायकेल क्लार्कच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया विश्वविजेता बनला.
आयसीसीने अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या या सर्व कर्णधारांचे एक छायाचित्र त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केले, परंतु आयसीसीकडून हे छायाचित्र पोस्ट करण्यात चूक झाली. खरं तर आयसीसीने हे चित्र पोस्ट करत ४ वर्ल्डकप लिहिले, मात्र प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाने एकूण ५ वर्ल्ड कप जिंकलेले आहेत.
ऑस्ट्रेलियासाठी विश्वचषक जिंकणारे कर्णधार निश्चितच चार होते, पण त्यांच्याकडे पाच ट्रॉफी आहेत कारण ऑस्ट्रेलियाने रिकी पाँटिंगच्या नेतृत्वात दोनदा विश्वचषक जिंकला आहे.
???? x 4️⃣
Iconic. pic.twitter.com/G7VDRZRWmD
— ICC (@ICC) May 12, 2020
उल्लेखनीय म्हणजे,२०१९ चा वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया अॅरॉन फिंचच्या नेतृत्वात खेळला. या विश्वचषकात उपांत्य सामन्यात इंग्लंडकडून पराभूत झाल्यानंतर त्यांच्या संघाला स्पर्धेतून बाहेर काढावे लागले.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना यजमानांसमोर २२४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य इंग्लंडने ३२.१ षटकांत ८ गडी राखून मिळवले. यानंतर इंग्लंडने थरारक फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला आणि प्रथमच वर्ल्ड कप जिंकला.
कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे जगभरातील सर्व क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत क्रिकेट बोर्डला खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्याच वेळी यावर्षी भारताला ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा होता, जर या साथीमुळे हा दौरा होऊ शकला नाही तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाला ५० दशलक्ष डॉलरचे कर्ज घ्यावे लागू शकते.
द सिडनी मॉर्निंग हेराल्डमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सर्व भागधारकांना कॉमनवेल्थ बँकेबरोबर कर्ज करार झाल्याची माहिती मिळाली आहे. सीएच्या संचालक समितीने मागील महिन्यात आपल्या ८० टक्के कर्मचार्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कर्जाला सहजपणे मान्यता मिळाल्यानंतर यावर आता प्रश्न उपस्थित होत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.