आंतरराष्ट्रीय नर्स डेनिमित्त विराट कोहलीने नर्सेसचे मानले आभार म्हणाला,”या कठीण काळात साथ दिल्याबद्दल धन्यवाद”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जग सध्या कोरोनाव्हायरस या साथीच्या आजाराने झगडत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक देशाने स्वत:ला लॉकडाऊनमध्ये टाकले आहे आणि शाळा-कार्यालयापासून ते संपूर्ण क्रीडा विश्‍व थांबले आहे. परंतु डॉक्टर व परिचारिका हे मात्र सध्या स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णालयात जात आहेत. आज आंतरराष्ट्रीय नर्स डे आहे, या निमित्ताने भारतीय कर्णधार विराट कोहलीने सर्व परिचारिकांना या कठीण परिस्थितीत साथ दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

विराट कोहलीने एक ट्विट केले आहे की, “अशा आव्हानात्मक वेळी आपल्या निःस्वार्थ सेवा, समर्पण आणि दयाळूपणाबद्दल आपले आभार. आपण सर्वजण एकत्रितपणे जल्लोष करूयात.”

भारतातील कोरोनाव्हायरस संक्रमित रुग्णांचा आकडा हा ७१ हजारांच्या पुढे गेला आहे. यापैकी २३ हजाराहून अधिक लोक आता बरे झाले आहेत तर २३१० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या सुरु असलेल्या देशव्यापी लॉकडाउननंतर ही परिस्थिती आहे, जर हा लॉकडाऊन उघडला गेला तर हा साथीचा रोग लवकर पसरण्याची शक्यता आहे.

 

भारतीय पंतप्रधान पीएम मोदी मंगळवारी म्हणजेच रात्री आठ वाजता देशाला पुन्हा एकदा संबोधित करतील, कदाचित यावेळी ते लॉकडाऊन ४.० वरही चर्चा करतील.

उल्लेखनीय आहे की अलीकडेच दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने विराट कोहलीला सचिन तेंडुलकरपेक्षा चांगला चेज मास्टर म्हटले होते. एबी डिव्हिलियर्स म्हणाला की, “सचिन तेंडुलकर हा मी आणि विराट कोहली या दोहोंसाठी एक आदर्श मॉडेल आहे. त्याने ज्या काळात फलंदाजी केली आणि आपल्या काळात अशी बरीच कामगिरी केली की तो तरूणांसाठी नेहमीच एक उत्तम उदाहरण आहे. कोहलीनेही असे म्हंटले आहे की सचिन तेंडुलकरने या खेळामध्ये एक स्टँडर्ड सेट केले आहे. “

परंतु तरीही रन चेज करताना विराट कोहली सचिन तेंडुलकरपेक्षा वरचढ असल्याचे डिव्हिलियर्सला वाटते. एबी डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या टीम आरसीबीकडून खेळतो, म्हणून त्याने विराट कोहलीला अगदी जवळून फलंदाजी करताना पाहिले आहे.

डिव्हिलियर्स पुढे म्हणाला, “पण मला वैयक्तिकरित्या असे वाटते की जेव्हा धावांचा पाठलाग करतो तेव्हा कोहली सर्वोत्तम असतो. तेंडुलकर प्रत्येक परिस्थितीत चांगला खेळत असे, परंतु धावांचा पाठलाग करण्याच्या दबावात येण्याबद्दल कोहली त्याच्या खूप पुढे आहे. विराट कोहली फलंदाजी करत असताना कोणतेही लक्ष्य सुरक्षित नसते. “

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment