हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय कर्णधार विराट कोहली आणि केन विल्यमसन यांच्यातील मैत्री किती खोलवर आहे भारताच्या न्युझीलंड दौर्यावर दिसून आले. या दौर्यादरम्यानच्या एका सामन्यात खेळत नसताना विल्यमसन आणि विराट हे दोन्ही महान खेळाडू बाउंड्रीजवळ बसून गप्पा मारत आनंद घेत होते. विराट कोहलीने बर्याच वेळा न्यूझीलंडचा संघ आणि त्याच्या कर्णधाराचे कौतुक केले आहे.
अलीकडेच विराट कोहलीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये केन विल्यमसनच्या पाठीवर हात ठेवत विराट कोहली पुढे जाताना दिसत आहेत. हा फोटो कसोटी सामन्यापूर्वीचा आहे. विराट कोहलीने हा फोटो शेअर केला आणि लिहिले “मला आमच्यातले संभाषण आवडते … केन विल्यमसन एक चांगला माणूस आहे”.
विश्वचषक २०१९ मध्ये न्यूझीलंडने उपांत्य सामन्यात पराभव करून भारताला बाहेरचा रस्ता दाखविला. यानंतर भारत न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला. या दरम्यान, विराट कोहलीला जेव्हा वर्ल्ड कपमधील पराभव न्यूझीलंडला नेणार की नाही असे विचारले असता तो म्हणाला, ” याची आवश्यकता नाही. तुम्हाला जरी सूड घ्यायचा असेल तरी ही माणसे इतकी चांगली आहेत की तसे करण्याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही. न्यूझीलंड हा एकमेव असा संघ आहे ज्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर संघांसाठी प्रगती करण्याचा एक उत्तम आदर्श ठेवला आहे. जेव्हा ते वर्ल्ड कप फायनलसाठी क्वालीफाईड झाले तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी खरोखरच आनंदी होतो. जेव्हा आपण हरलात तेव्हा आपल्याला मोठे चित्र पहावे लागेल. म्हणून त्यामध्ये सूड घेण्यासारखे काहीही नाही. “
न्यूझीलंडच्या या दौर्यावर भारताने ५ टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली. यामध्ये टीम इंडिया टी -२० मालिकेत यजमानांना व्हाईट वॉश देण्यास यशस्वी ठरली, मात्र त्यानंतर न्यूझीलंडच्या संघानेही उत्तर देत एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत भारताला व्हाईट वॉश दिला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.