संजय राऊतांना कोण ओळखत, ते कोणाचे प्रवक्ते आहेत ; देवेंद्र फडणवीसांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि भाजप नेत्यांवर निशाणा साधत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. राऊतांच्या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले. “राऊतांना गोव्यात कोण ओळखतं?, त्यांना महत्व देण्यात काही अर्थ नाही. राऊत हे कोणाचे प्रवक्ते आहेत, हे आम्हाला पहिल्यापासूनच माहिती आहे,” असे फडणवीसांनी म्हंटले.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीवेळी शरद पवार रींगणात आले. त्यांनी इतरांचा हातात हात घेत फोटोही काढले. महाविकास आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आताही ते तसेच करीत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचार करून बोलावे. संजय राऊत आज शरद पवारांविषयी जे बोलले हाच विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलताना करावा. आपली उंची किती आणि पंतप्रधान मोदी यांची उंची किती, हे त्यांनी लक्षात घ्यावे,असे फडणवीस म्हणाले.

देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेचा मुद्दा हा राजकीय निवडणुकीसाठी वापरणे योग्य नाही. तो मुद्दा हा खऱ्या अर्थाने सुरक्षेचा आहे. त्यामुळे या मुद्यांवर राजकारण केने योग्य नाही. भाजपमधून जे लोक बाहेर जात आहेत, त्यांना माहिती आहे कि भाजप त्यांना यावेळेस उमेदवारीचे तिकीट देणार नाही. म्हणून ते दुसऱ्या पक्षात जात असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.