“फलंदाजीत जर धोनी वरच्या क्रमांकावर खेळला असता तर त्याने अनेक विक्रम केले असते,”- गौतम गंभीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महेंद्रसिंह धोनीने जर एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली असती तर आजच्या घडीला तो फलंदाजीतील अनेक विक्रम त्याने आपल्या नावावर केले असते, असे मत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केले आहे. ऑनलाईन झालेल्या आपल्या मुलाखती दरम्यान गंभीरने क्रिकेट विषयी मनसोक्त गप्पा मारल्या.

धावांचा पाठलाग करताना धोनी कि विराट कोहली यांच्यातील सर्वोत्तम कोण, या विचारलेल्या प्रश्नावर गंभीरने सांगितले की, ‘‘धोनी आणि कोहली या दोघांमध्ये तुलना करणे खूपच अवघड आहे. कारण विराट हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो तर धोनी हा सहाव्या किंवा सातव्या स्थानावर फलंदाजीला येतो. श्रीलंका, बांगलादेश आणि वेस्ट इंडिज या संघांची आजच्या घडीची गोलंदाजी पाहता धोनीने नक्कीच भरपूर फटकेबाजी केली असती आणि फलंदाजीतले अनेक विक्रम त्याच्या नावावर केले असते.”

भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा सध्याच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहे, असेही गौतम गंभीरने यावेळी सांगितले. तसेच आताच्या युवा खेळाडूंमध्ये लोकेश राहुल हा सर्वात प्रभावशाली खेळाडू आहे, असेदेखील गंभीरने यावेळी म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment