कोरोना संकटामुळे इंन्कम टॅक्स भरण्याची मुदत ‘या’ तारखेपर्यंत वाढली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नोकरदार लोकांना केंद्र सरकारने एक मोठा दिलासा दिला आहे. सध्या सुरु असलेल्या लॉकडाउन आणि कोरोना दरम्यान आपला इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची मुदत सरकारने 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविली आहे. प्राप्तिकर विभागाने बुधवारी एक अधिसूचना जारी करुन म्हटले आहे की आर्थिक वर्ष 2019-20 साठीचे इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

यापूर्वी सरकारने 31 जुलै रोजी इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची मुदत वाढविली होती, मात्र आता ही मुदत 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याच वेळी, आपण आर्थिक वर्ष 2018-19 साठी रिवाइज्ड आयकर रिटर्न दाखल करू इच्छित असाल तर यासाठीची अंतिम तारीख आता 31 जुलै 2020 अशी करण्यात आली आहे. आयकर विभागाने 30 नोव्हेंबर 2020 रोजी सेल्फ अ‍ॅसेसमेंट टॅक्स 1 लाखांपेक्षा कमी आणि मध्यम करदात्यांची टॅक्स भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2020 केली आहे. मात्र त्याचबरोबर 1 लाखाहून अधिक देणे असणाऱ्यांच्या मुदतीत कोणताही बदल केलेला नाही.

प्राप्तिकर विभागात कर माफीसाठी 80 C, 80 D और 80 G अंतर्गत केलेल्या गुंतवणूकीची शेवटची तारीख 31 जुलै 2020 करण्यात आली आहे. कोविड -१९ मधील वाढत्या घटना लक्षात घेता सीबीडीटीने प्राप्तिकर अधिनियम 1961 अंतर्गत या मुदती वाढवल्या आहेत. आयकर रिटर्न फॉर्मसहसा एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात सूचित केला जातो.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.