“बाळासाहेबांच्या आशीर्वादानेच फडणवीस मुख्यमंत्री झाले ”; एकनाथ खडसेंचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर काही दिवसापूर्वी टीका केली होती. शिवसेनेने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्विकारलेलं आहे , असे फडणवीसांनी म्हंटले होते. त्यांना आज राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “फडणवीसांनी बाळासाहेबांबद्दल केलेले वक्तव्य पंतप्रधान मोदींनाही मान्य नसावे. म्हणून तर बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादानेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले,” असा टोला खडसे यांनी फडणवीसांना लगावला आहे.

एकनाथ खडसे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “नरेंद्र मोदींनाही देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य मान्य नसावे. देवेंद्र फडणवीस हे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाले होते. त्या मंत्रीमंडळात मीसुद्धा होतो. आपले राजकीय विचार बाजूला ठेऊन त्यांनी त्यांचा आदर ठेवायला पाहिजे होता. अलिकडे ते जी वक्तव्ये करत आहेत ती नैराश्यातून आलेली असावीत, असे वाटत आहेत.

दरम्यान खडसे यांनी फडणवीसांवर टीका केल्याने त्यांच्या या टीकेला फडणवीस काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, फडणवीसांनी केलेल्या टिकेवरून आता शिवसेना आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वातावरण मात्र, चांगलेच तापले आहे.