हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पश्चिम बंगाल, आसामसह तमिळनाडू, केरळ या राज्यात आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात येत्या काही दिवसातच निवडणुका होणार असल्याची नुकतीच घोषणा करण्यात आलीय. मुख्य निवडणूक आयुक्तांनी आज पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीची घोषणा केली आहे. आज निवडणूक आयोगाने या पाचही राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या. त्यामुळे या राज्यांमधील निवडणुकांकडे लक्ष ठेऊन असलेल्यांची प्रतिक्षा संपलीय. संपूर्ण देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही या पाच राज्यात निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी उपाययोजनांचीही माहिती दिली.
निवडणुका या तीन टप्प्यात होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.पहिला टप्प्यात मतदान २७ मार्चला होणार आहे.दुसऱ्या टप्प्यात मतदान १ एप्रिल रोजी तर मतदानाचा तिसरा टप्प्यांत ६ एप्रिल रोजी मतदान पार पडेल.तर निकाल २ मे रोजी लागणार असल्याची आज घोषणा करण्यात आली आहे.
आसाम मध्ये भाजप, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, केरळ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, तामिळनाडूत एआयडीएमके सत्तेत आहे तर पुद्दूचेरीत काँग्रेसचे मुख्यमंत्री वेलू नारायणस्वामी यांनी राजीनामा दिल्यामुळे सध्या तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.खऱ्या अर्थाने कांटे की टक्कर पश्चिम बंगाल आणि आसाम मध्ये पाहायला मिळेल असं काही राजकिय पंडितांचे म्हणणे आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.