Elon Musk vs Randeep Hothi : भारतीय-अमेरिकन विद्यार्थ्याकडून एलन मस्क यांना आव्हान, नक्की प्रकरण काय आहे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वॉशिंग्टन । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचा (Tesla) मालक असलेल्या एलन मस्क (Elon Musk) यांना भारतीय-अमेरिकन विद्यार्थी रणदीप होठी Randeep Hothi) याने कडवे आव्हान दिले आहे. वास्तविक, रणदीप होठी याने मानहानीचा दावा दाखल केला आहे ज्याच्या पहिल्या फेरीत एलन मस्कला पराभवाला सामोरे जावे लागले.

कोण आहे रणदीप
रणदीप हा कॅलिफोर्निया, बर्कले विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आहे आणि सध्या तो अमेरिकेच्या मिशिगन युनिव्हर्सिटीत आशियाई भाषांचा विद्यार्थी आहे. तो एलन मस्क आणि टेस्ला चा टीकाकार आहे. त्याचे पालक फ्रेमोंट येथे राहतात, जेथे टेस्लाचा स्वतःचा एक प्लांट देखील आहे. रणदीप ट्विटरवर ‘skabooshka’ च्या नावाने अ‍ॅक्टिव आहे. त्याने ट्विटरवर लिहिले आहे कि,”कॉर्पोरेट घोटाळ्याबद्दल इन्व्हेस्टिगेशन / रिपोर्टिंग.”

होठी हा ग्लोबल ग्रुपचा भाग आहे, ज्यांना एकत्रितपणे ‘$TSLAQ’ असे म्हणतात. हा ग्रुप टेस्लाचे माजी कर्मचारी, होटी आणि इतर व्यावसायिकां द्वारे बनवला गेला आहे. त्यापैकी अनेक जण सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्मवर अनेकदा एलन मस्क आणि टेस्लावर टीका करत असतात.

प्रकरण नक्की काय आहे ?
दोन घटना घडल्यानंतर रणदीप दोन वर्षांपूर्वी मस्कच्या निशाण्यावर आला होता. फेब्रुवारी 2019 मध्ये, कॅलिफोर्नियामधील टेस्ला येथील सेल्‍स सेंटरला भेट दिल्यावर रणदीपने सुरक्षा रक्षकाशी भांडण केले. त्याच वेळी एप्रिल 2019 मध्ये आणखी एक घटना घडली. रणदीप म्हणाला की,” टेस्लाची टेस्ट कार पाहिल्यानंतर त्याचे फोटोस ऑनलाइन पोस्ट केले गेले. मस्कने ऑनलाईन संपादकाला मेल केला आणि सांगितले की,”त्याने आमच्या सुरक्षा रक्षकाला जवळपास मारलेच होते.” तर दुसरीकडे, होठी म्हणाला की,”मस्कने त्याच्याविरूद्ध ऑनलाइन द्वेष मोहीम चालविली.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.