अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई |
कोरोनाच्या या काळात राज्य सरकार पार अपयशी ठरले असून शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे, कापूस खरेदी बंद आहे, आता पेरणीला काही दिवसात सुरवात होणार आहे, मात्र महाविकास आघाडीचे सरकार झोपी गेले आहे असा आरोप करत राज्याचे माजी कृषी मंत्री व भाजपा नेते अनिल बोंडे यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रतिकात्मक कापसाची गादी करत या गादीला काळा कपडा गुंडाळून त्यावर मुख्यमंत्री सह मंत्र्यांचे नाव लिहत ती गाडी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेट दिली
विदर्भातील शेतकऱ्यांची कापूस खरेदी मंदावली आहे. त्यामुळे लाखो क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे तर कर्ज वितरण सुद्धा बंद आहे अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करावे हे समजत नाही,शरद पवारांनी साखरीसाठी पॅकेज मागितले मात्र कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पॅकेजची घोषणा व मागणी केली नाही तर असंघटित कामगारावर उपासमार आली त्यांच्यावर देखील सरकारचे लक्ष नाही त्यामुळे या झोपलेल्या सरकारच्या मंत्र्यांनी आता झोपूनच रहावे त्यासाठी आम्ही कापुसाची गादी त्यांनी भेट देत आहे असे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्र सरकार कोरोना वर उपाययोजना करण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसे नाही त्यामुळे तो हतबल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आलेले आहे. शरद पवारांनी साखरेवर पंकज मागितलं पण ते कधीही कापसावर बोलत नाहीत. आज असंघटित कामगारांची अवस्था दयनीय झाली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.