हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ब्राझील मधून जपानमध्ये आलेल्या चार प्रवाशांमध्ये कोरोनाच्या नवीन विषाणूचा प्रकार आढळून आला असून त्याची पुष्टी जपानच्या आरोग्य मंत्रालयाने केली आहे. वरील चार प्रवासी ब्राझीलच्या ॲमेझॉन राज्यातील आहेत. सध्या आढळून आलेल्या नवीन विषाणू वरती औषध शोधून काढण्याचे काम जपानच्या आरोग्य मंत्रालयाने हाती घेतलेले असल्याची माहितीही मंत्रालयाने दिली.
कोरोनाचे जे नवीन विषाणू आढळून आले आहेत ते ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळून आलेल्या करोणा विषाणू पेक्षा वेगळे आहेत. जपानच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फेक्शन्स डिसीजेस’ या संस्थेचे प्रमुख टाकाजी वाकीता यांनी यासंदर्भात माहिती दिली असून ते पुढे म्हणाले की, ‘आत्ताच्या घडीचा विचार केला असता नवीन कोरोना विषाणू हा जुन्या विषाणू घातक आहे की सौम्य आहे, याचे पुरावे आणि माहिती अजून प्राप्त झाली नाही’.
कोरोना विषाणूचे 12 मुटेशन प्रकार असून त्यापैकी एका प्रकारातील विषाणू हे ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळून आले होते. 2 जानेवारी रोजी जपानच्या टोकियो शहरातील हनेडा विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांपैकी, एका प्रवासाला श्वसनाचा त्रास होता तर तिशीतील एका महिलेला डोकेदुखी आणि घसा दुखी, इतर एका व्यक्तीला ताप आला होता तर चौथ्या व्यक्तीला कुठलेही लक्षण आढळून आले नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.