आता मध्यमवर्गीयही घेऊ शकतील Ayushman Bharat चा लाभ, फ्री मध्ये मिळेल पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आरोग्याच्या आघाडीवर देशाच्या मध्यमवर्गाला केंद्र सरकारने मोठी भेट दिली आहे. देशात मध्यमवर्गीय कुटुंबांना सामावून घेण्यासाठी आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यातून देशातील मध्यमवर्गीय कुटुंबांनाही उपचारांसाठी वर्षाकाठी पाच लाख रुपयांचे आरोग्य कवच मिळणार आहे. यापूर्वी केवळ आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांनाच या योजनेचा लाभ मिळू शकत होता, परंतु आता देशातील मध्यमवर्गीयही या योजनेंतर्गत 5 लाख रुपयांच्या आरोग्य विम्यास पात्र ठरणार आहेत आणि त्यांचे उपचार घेऊ शकणार आहेत.

सरकारने या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सर्व आरोग्य विमा योजना एकत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरात ही योजना राबविणारी संस्था राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए) च्या गव्हर्निंग कौन्सिलने देशभरात यासाठी मान्यता दिली आहे, जेणेकरून मध्यमवर्गीयांना या योजनेचा फायदा होऊ शकेल.

पाच लाख रुपयांपर्यत उपचार फ्री मध्ये केले जातील
आता या योजनेचा पायलट प्रोजेक्ट सुरू होईल, जेणेकरुन ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी कोणती पावले उचलावी लागतील हे समजू शकेल. या योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. आता आयुष्मान भारत योजनेचा 10.74 कोटी कुटुंबातील 53 कोटी लोक लाभ घेत आहेत. या योजनेंतर्गत रुग्णालयात पाच लाख रुपयांपर्यतचे मोफत उपचार केले जातात.

या लोकांना याचा फायदा होईल
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (एनएचए) म्हटले आहे की जे लोक इनफॉर्मल सेक्टर मध्ये काम करतात त्यांना या योजनेच्या विस्ताराचा सर्वाधिक फायदा होईल, जे आतापर्यंत कोणत्याही आरोग्य विमा योजनेपासून दूर होते. या योजनेचा फायदा इनफॉर्मल सेक्टर मध्ये काम करणाऱ्यां व्यतिरिक्त स्वयंरोजगार (self-employed), MSME सेक्टर आणि मध्यमवर्गीय शेतकर्‍यांना होईल.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या गव्हर्निंग बोर्डाने भारत सरकारच्या विविध मंत्रालयांमार्फत राबविल्या जाणाऱ्या आरोग्य योजनांना आयुष्मान भारत योजनेत एकत्रित करण्यास मान्यता दिली आहे. यासह, सरकारी आणि खासगी क्षेत्रातील करारावर काम करणारे लोक, कंस्ट्रक्शनच्या कामात गुंतलेले लोक, सेंट्रल आर्म्ड फोर्सचे कर्मचारी आणि रस्ते अपघातग्रस्तांवर उपचार करण्यास मदत होईल.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : http://www.hellomaharashtra.in

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook