हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्राझीलमध्ये एका महिन्यापासून व्हेंटिलेटरवर असूनही एका ५ महिन्यांच्या बाळाने कोरोनाव्हायरसवर मात केली. डॉक्टर हा एक चमत्कारच मानत आहेत. येथे काही महिन्यांपूर्वी ५ महिन्यांची एक मुलगी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सीएनएनच्या वृत्तानुसार, ही मुलगी गेल्या एका महिन्यापासून कोमामध्ये होती असे असूनही ती वाचली गेली.
या बाळाच्या आई-वडिलांनी याला एका चमत्कारापेक्षा कमी मानले नाही. ते म्हणाले आहेत की, एखाद्या नातेवाईकाने भेट देताना या मुलीला संसर्ग झाला असेल. डोम नावाच्या या मुलीला रिओ दि जानेरो प्रो कॉर्डिको रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर जवळपास ५४ दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. यानंतर तिला आता घरी सोडण्यात आले आहे.
सीएनएनशी बोलताना बाळाच्या वडिलांनी सांगितले की, आपल्या मुलीला श्वास घेण्यात त्रास होत होता. सुरुवातीच्या काळात डॉक्टरांनी हा एक प्रकारचा बॅक्टेरियाचा संसर्ग असल्याचे मानले. मात्र यावर काहीच इलाज चालला नाही आणि तिची प्रकृती अधिकच खराब झाली. यानंतर त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने तिला दुसर्या एका हॉस्पिटलमध्ये हलवले. यावेळी या मुलीची कोरोना टेस्ट घेण्यात आली, ज्यामध्ये ती पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले.
लॅटिन अमेरिकेत ब्राझील हा देश कोरोना विषाणूचे केंद्र बनला आहे. कोरोनामुळे इथे आतापर्यंत १२ महिन्यांच्या जवळपास २५ मुलांचे मृत्यू झालेले आहेत. देशाच्या आरोग्य विभागाने हा डेटा जाहीर केला आहे.
जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार ब्राझीलमध्ये आतापर्यंत ५ लाख १४ हजार ८४९ जणांना विषाणूच्या संसर्ग झाल्याची नोंद आहे. या विषाणूमुळे इथे २९ हजार ३०० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.