हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्या-चांदीच्या किंमती पुन्हा वाढल्या आहेत. याचाच परिणाम आज सोन्याच्या देशांतर्गत वायदे बाजारावरही दिसून येतो आहे. एमसीएक्सवरील सोन्याचा वायदा दर प्रति 10 ग्रॅम 0.27 टक्क्यांनी किंवा 137 रुपयांनी वाढून 51,585 रुपये झाला, तर चांदीचा वायदा 1.89 टक्क्यांनी वाढून 1,302 रुपये प्रति किलो झाला. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की भारत आणि चीनमधील वाढत्या तणावामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील सोन्याच्या किंमती नव्या उंचीवर पोहोचू शकतात. सात ऑगस्ट रोजी भारतातील सोन्याच्या किंमती 56,200 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्या, परंतु तेव्हापासून जागतिक स्तरावर सोन्याच्या किंमती चढउतारांसह अस्थिर आहेत.
शुक्रवारी सोने स्वस्त झाले
एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 252 रुपयांनी स्वस्त झाले. यानंतर सोन्याची नवीन किंमत आता प्रति 10 ग्रॅम 52,155 रुपयांवर गेली आहे. यापूर्वी गुरुवारी सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 52,407 रुपयांवर होते.
सोन्याच्या किंमती 2 आठवड्यांच्या नवीन उंचीवर पोहोचल्या
जागतिक पातळीवर सोमवारी सोन्याच्या किंमती जवळपास दोन आठवड्यांच्या उंचीवर पोहोचल्या. कमकुवत झालेल्या डॉलरमुळे सोन्याची मागणी वाढली तसेच अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या नवीन धोरणाने आगामी काळात व्याजदर काही काळ कमी राहण्याचे संकेत दिले आहेत.
गेल्या 5 महिन्यांपासून सोन्यावर सर्वाधिक सवलत
देशांतर्गत बाजारात कमी मागणीमुळे सोन्याच्या व्यापाऱ्यांना सोन्याच्या किंमतीवर प्रचंड सूट द्यावी लागत आहे. भारतात सोन्यावरील सूट प्रति औंस सुमारे 43 डॉलर्स इतकी झाली आहे, जी मागील 5 महिन्यांत सोन्याची सर्वाधिक सवलत आहे.
वृत्तसंस्था रॉयटर्सने आपल्या एका अहवालात याबाबत माहिती दिली आहे. केवळ शेवटच्या आठवड्यात सोन्याच्या विक्रेत्यांनी सोन्याच्या किंमतीवर 20 डॉलर पर्यंत सूट दिली आहे. मागणी कमी करण्याव्यतिरिक्त सोन्यावर भारपूर सूटही दिली जात आहे जेणेकरून जुना साठा संपेल. भारतात सोन्यावर 12.5 टक्के आयात शुल्क आणि 3 टक्के जीएसीटी देय आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.