हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमती पुन्हा वाढल्या आहेत. कमकुवत झालेल्या अमेरिकन डॉलरमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. त्याचबरोबर भारतीय बाजारात देखील रुपया कमकुवत झाला आहे. ज्यामुळे सोन्याचे दर वाढले आहेत. दिल्ली सराफा बाजारात प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या किंमती 161 रुपयांनी वाढल्या आहेत. तसेच, यावेळी चांदीच्या किंमतीतही 800 रुपये प्रति किलो वाढ झाली आहे. तज्ज्ञांचे याबाबत असे म्हणणे आहे की, भारत आणि चीनमधील वाढत्या तणावामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील सोन्याच्या किंमती नव्या उंचीवर पोहोचू शकतात. सात ऑगस्ट रोजी भारतातील सोन्याच्या किंमती 56,200 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्या, परंतु तेव्हापासून जागतिक स्तरावर सोन्याच्या किंमती चढउतारांसह अस्थिर आहेत. मात्र, ऑगस्टमध्ये सोन्याच्या किंमती स्थानिक बाजारात प्रति दहा ग्रॅम 4000 रुपयांनी घसरल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती 2 आठवड्यांच्या नव्या उंचीवर पोहोचल्या
जागतिक पातळीवर सोमवारी सोन्याच्या किंमती जवळपास दोन आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. कमकुवत झालेल्या डॉलरमुळे सोन्याची मागणी वाढली आहे तसेच अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या नवीन धोरणाने आगामी काळातही व्याजदर काही काळ कमी राहण्याचे संकेत दिले आहेत.
सोन्याचे नवीन दर
एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते सोमवारी दिल्ली सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 52,477 रुपयांवरून 52,638 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. या काळात दर प्रति 10 ग्रॅमच्या किंमती 161 रुपयांनी वाढल्या आहेत. त्याचबरोबर मुंबईतील 99.9 टक्के सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 51405.00 रुपये झाली आहे.
चांदीचे नवीन दर
सोन्याप्रमाणेच चांदीच्या भावातही वाढ दिसून आली आहे. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये एक किलो चांदीची किंमत 67,295 रुपयांवरून 68,095 रुपयांवर गेली आहे. या काळात किंमती 800 रुपयांनी वाढल्या आहेत. त्याचबरोबर मुंबईतील चांदीचा दर प्रतिकिलो 66516 रुपयांवर आला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.