नवी दिल्ली | स्वास्थ्य विमा योजनेतील लाभार्थीच्या घरापासून दहा किलोमीटरपर्यंत जर इएसआयसी हॉस्पिटल नसेल तर, तो कर्मचारी राज्य विमा निगममधील सुचीमध्ये सामील असलेल्या खासगी हॉस्पिटलमध्ये इलाज करण्याकरता जाऊ शकणार आहे. गुरुवारी केंद्रशासनाच्या श्रम शासकीय निर्णयांमध्ये याची माहिती दिली.
केंद्रीय श्रम मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, लाभार्थींच्या संखेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढलेल्या इएसआय कर्मचाऱ्यांना घराजवळच उपचार मिळावेत यासाठी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि हॉस्पिटलची सुविधा देण्याच्या या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत. सोबतच असेही सांगितले की, सध्या काही क्षेत्रांमध्ये ईएसआय हॉस्पिटल अथवा डिस्पेंसरी इन्शुरन्स मेडिकल प्रॅक्टिशनर हे त्या कर्मचाऱ्यांच्या दहा किलोमीटरच्या परिघातमध्ये उपलब्ध नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना उपचार मिळणे कठीण नाही होत आहे. यामुळे लाभार्थ्यांना पॅनलमध्ये समाविष्ट असणाऱ्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याची सुविधा प्राप्त करुन दिली आहे. यासाठी लाभार्थींना कोणत्याही ईएसआईसी हॉस्पिटलमध्ये मंजुरी घेण्याची आवश्यकता नाही.
श्रम मंत्रालयानुसार कर्मचाऱ्यांना ओपीडीची सुविधा मुक्त प्राप्त करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जावे लागणार आहे. सोबत त्यांनी त्यांचे ईएसआय कार्ड किव्वा पासबुक दाखवणे गरजेचे आहे. सोबतच आधार कार्डही दाखवणे गरजेचे आहे. डॉक्टरांनी ओपीडीमधून औषधे सांगितले आहेत त्या औषधावरील खर्च त्यांना परत मिळू शकणार आहे. ही सुविधा मिळवण्यासाठी लाभार्थींना इएसआयसीच्या क्षेत्रीय कार्यालयात जावे लागेल. कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागत असल्यास, खाजगी रुग्णालयांना 24 तासाच्या आतमध्ये ईएसआयसीच्या अधिकाऱ्यांकडून मंजुरी प्राप्त करणे आवश्यक होणार आहे. या अंतर्गत लाभार्थींना कॅशलेस सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.