Google आता भारतात करणार 75 हजार कोटींची गुंतवणूक, भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला मिळणार गती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुगलने भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी 75,000 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले की, देशात होणाऱ्या सहाव्या गुगल फॉर इंडिया कार्यक्रमात भारतात 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. ते म्हणाले, ‘डिजिटल अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी पुढील 5 ते 7 वर्षांत गुगल 75 हजार कोटींची गुंतवणूक करेल. इकोसिस्टम इन्वेस्टमेंट्स मध्ये ही गुंतवणूक इक्विटी इन्वेस्टमेंट, पार्टनरशिप आणि ऑपरेशनल इंफ्रास्ट्रक्चरचे मिश्रण असेल.

गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही मोबाइल मॅन्युफॅक्चरिंगबरोबर पार्टनरशिप केली आहे आणि स्वस्त दरात मोबाइल फोन उपलब्ध करून देण्याच्या दिशेने काम सुरु केले आहे. Google My Business चे 26 मिलियन डिजिटायझेशन झाले आहे. तसेच 3 मिलियन लोकं गूगल पे वापरतात.

 

जीएसटी आणि भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये गूगलची महत्त्वाची भूमिका
जीएसटी आणि भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये गुगलने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आर्टिफिशियल इंटेलीजेसी हे आरोग्य आणि शेतीसाठी खूप महत्वाचे आहे. पूरासारख्या आपत्ती मध्ये गुगलने अनेक प्रभावी पावले उचलली आहेत. तसेच, भारतीय भाषेचे डिजिटायझेशन करण्याचे काम केले आहे. भारताची अ‍ॅप अर्थव्यवस्था ही वेगाने वाढत आहे. आम्ही केवळ अ‍ॅपच्या डाउनलोडमध्येच नाही तर अपलोडमध्येही पुढे जाऊ. गुगल भारताच्या डिजिटल व्हिलेजवर वेगाने काम करीत आहे

डिजिटल एज्युकेशनसाठी 1 मिलियन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक
गूगल कडून भारतात 1 मिलियन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक डिजिटल एज्युकेशन आणि शिक्षकांच्या ट्रेनिंगसाठी केली जाईल. डिजिटल इंडियामध्ये शिक्षणाची जाहिरात करण्याचे काम डिजिटल इंडियामध्ये केले गेले आहे. विशेषतः लॉकडाऊन दरम्यान डिजिटल एज्युकेशनमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

Leave a Comment