भारत सरकार केव्हाही करू शकते दुसऱ्या मदत पॅकेजची घोषणा, यावेळी काय खास असेल ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर आलेल्या मंदीवर मात करण्यासाठी पुढील मदत पॅकेजची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील मदत पॅकेज हे आधीच्या तुलनेत लहान असू शकते. यामध्ये कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वाधिक प्रभावित होणारी क्षेत्रे हॉटेल, पर्यटन, एव्हिएशन आणि हॉस्पिटॅलिटी यावर सर्वाधिक जोर देतील. या बातमीनंतर स्पाइस जेट, डेल्टाकॉर्प सारख्या शेअर्सनी चांगली कमाई केली आहे.

पुढील मदत पॅकेज कसे असेल?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील मदत पॅकेजची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. हे कधीही घोषित केले जाऊ शकते. आधीच्या पॅकेजपेक्षा पुढील पॅकेज हे खूपच लहान असेल. या आगामी मदत पॅकेजमध्ये हॉटेल्स, पर्यटन, एव्हिएशन अशा क्षेत्रांवर विशेष भर देण्यात येईल अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान कार्यालय (PMO) आणि अर्थ मंत्रालयात यावर 3-4 फेऱ्यात बैठक झाली.

दुसर्‍या मदत पॅकेजेसमध्ये काय खास असेल?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये कर सवलतींवर अधिक जोर दिला जाऊ शकतो म्हणजेच दुसर्‍या मदत पॅकेजमध्ये करात सूट मिळेल. अनेक क्षेत्रात कर सवलत जाहीर केली जाऊ शकते. तसेच कर्जाची परतफेड करण्याची मुदतही वाढवली जाऊ शकते. याशिवाय इतरही अनेक उपाययोजना करण्याच्या तयारी सरकार करत आहे. या पॅकेजमध्ये लोकांची खरेदी क्षमता वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. यामध्ये कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वाधिक प्रभावित होणारी क्षेत्रे हॉटेल, पर्यटन, एव्हिएशन आणि हॉस्पिटॅलिटी यावर सर्वाधिक जोर देण्यात येईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.