हॅलो महाराष्ट्र । अनेक नागरिकांच्या तक्रारींद्वारे (Public Grievances) भारत सरकारला हे समजले आहे की, बरेच परदेशी देश भारतीय नागरिकांना देण्यात आलेले आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट स्वीकारत नाहीत. ANI ने ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी जारी केलेल्या आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिटच्या (आयडीपी) पहिल्या पानावर शिक्कामोर्तब करण्याचा सल्ला दिला आहे.
जर तुम्हालाही परदेश दौर्यावर जायचे असेल आणि तेथे गाडी चालवायची असेल तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता असेल. परंतु असे काही देश आहेत जेथे आपल्याला वाहन चालविण्यासाठी आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परवान्याची आवश्यकता नाही.
चला तर मग जाणून घेउयात कि असे कोणते देश आहेत जिथे भारताचे ड्रायव्हिंग लायसन्स चालू शकते आणि त्यासाठी कोणत्या अटी आहेतः
1. यूके
यूकेमध्ये, इंडियन डॉमेस्टिक ड्रायव्हिंग लायसन्स 1 वर्षासाठी व्हॅलिड आहे. येथे आपण स्कॉटलंड, वेल्स आणि इंग्लंडच्या रस्त्यावरुन गाडी चालवू शकता. मात्र आपण प्रत्येक प्रकारचे वाहन चालवू शकत नाही. यासाठी काही निर्बंध आहेत.
2. ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय मोठ्या प्रमाणात अभ्यास, नोकरी तसेच फिरायला जातात. येथे न्यू साउथ वेल्स, क्वीन्सलँडमध्ये भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी वापरता येईल. मात्र यासाठी तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स इंग्रजीमध्ये असावे. त्यासोबतच ड्रायव्हिंगसाठी परमिट देखील असावे.
3. न्यूझीलंड
न्यूझीलंडमध्येही भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स व्हॅलिड आहे परंतु ते इंग्रजीमध्येच असणे आवश्यक आहे. जर ते इंग्रजीत नसेल तर त्याचे न्यूझीलंडच्या व्हॅलिड भाषेत ट्रांसलेटेड असले पाहिजे. तसेच, न्यूझीलंडमध्ये केवळ 21 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाची व्यक्ती वाहन चालवू शकते.
4. फ्रान्स
फ्रान्समध्येही इंडियन ड्रायव्हिंग लायसन्स द्वारे ड्रायव्हिंग करता येते पण ते तिथल्या भाषेतच असले पाहिजे. ते तेथे 1 वर्षासाठी व्हॅलिड राहते.
5. नॉर्वे
नॉर्वेमध्ये, 3 महिन्यांपर्यंत इंडियन ड्रायव्हिंग लायसन्स द्वारे ड्रायव्हिंग करता येते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.