‘निसर्ग’ चक्रीवादळाची रायगड किनारपट्टीकडे वेगवान कूच 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अरबी समुद्रातील निसर्ग हे चक्रीवादळ आता वेगाने पुढे सरकत आहे. या वादळाने त्याचे रौद्र रूप धारण केले असून  खात्याने सॅटेलाईट द्वारे काढलेले छायाचित्र प्रसिद्ध  केले आहे. हे वादळ हवामान खात्याने अंदाज दर्शविल्याप्रमाणे ताशी ११० ते १२० किमी वेगाने रायगड च्या किनारपट्टीवर दुपारी १ ते ४ च्या दरम्यान धडकण्याची शक्यता आहे.  भूपृष्ठावर आल्यानंतर हे वादळ मोठ्या प्रमाणात नुकसान करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यावेळी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर  नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

वादळ जसजसे किनारपट्टीकडे सरकत आहे, तसतसा वाऱ्याचा वेगही वाढतो आहे. सकाळी ८.३० वाजताच्या नोंदीनुसार रत्नागिरीत ५५ किमी वेगाने वारे वाहत होते. त्याचवेळी कोकण किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग ताशी ५५ ते ६५ किमी इतका होता. दुपारी हा वेग आणखी वाढून १०० ते ११० किमी पर्यंत जाईल. प्रत्यक्षात वादळ किनारी धडकेल तेव्हा वाऱ्याचा वेग ताशी १२० किमी च्या आसपास असेल, असे हवामान विभागाने नमूद केले आहे. दुपारी १ ते ४ च्या दरम्यान केव्हाही हे वादळ  किनारपट्टीवर धडकेल असे हवामान खात्याने सांगितले आहे.

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रभर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडत आहे. काही भागांत पावसाची संततधार सुरू आहे. रत्नागिरीजवळ ‘बसरा स्टार’ हे व्यापारी जहाज वादळात अडकले होते. या जहाजाला मुंबईच्या किनाऱ्यावर यायचे आहे. समुद्र खवळला असल्याने नौकायान महासंचालक कार्यालयाकडून विशेष जहाज पाठविण्यात आले आहे. बचावकार्यासाठी नौदलाच्या युद्धनौका अरबी समुद्रात सज्ज झाल्या आहेत. मुंबई तसेच परिसरासाठी नौदलाचा आठ बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment