विश्वचषक २०१९ आजच्याच दिवशी भारताने पाकिस्तानवर मिळवला होता शानदार विजय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये खेळविला जाणारा कोणताही क्रिकेट सामना म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच असते. आणि अशातच तो सामना जर विश्वचषकातील असेल, तर मग सामन्यातील रोमांच अगदी शिगेला पोहोचतो. गेल्या वर्षीच इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडच्या ओल्ड ट्रफर्ड या मैदानावर भारतीय संघाने साखळी सामन्यात पाकिस्तानच्या संघाला पराभूत केले होते. टीम इंडियाची दमदार गोलंदाजी-आणि तितकीच धमाकेदार फलंदाजी यामुळे पाकच्या संघाला ८९ धावांनी पराभूत व्हावे लागले होते. तसेच या विजयासह भारताने पाकिस्तानला विश्वचषक स्पर्धेत सलग सात वेळा पराभवाची चव चाखायला लावली. त्या सामन्याला आज बरोबर एक वर्ष पूर्ण झालले आहे. ICC ने देखील या सामन्याबाबतची एक आठवण शेअर केली आहे.

या सामन्यांत पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. मात्र त्याचा हा निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलट आला. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी तब्ब्ल १३६ धावांची शतकी भागीदारी केली. राहुल बादनंतर रोहितने मग कर्णधार विराट कोहलीच्या संगतीने भारतीय संघाच्या डावाला आकार दिला. या दोन्ही खेळाडूंमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली. रोहितने त्या सामन्यांत १४० धावांची खेळी केली, तर विराट कोहलीने ७७ धावा केल्या. अशाप्रकारे ५ गड्यांच्या मोबदल्यात भारतीय संघाने ५० षटकांत ३३६ धावा केल्या.

 

भारताच्या या ३३७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाक संघाच्या नाकी नऊ आले. ३५ व्या षटकापर्यंत पाकिस्तानी फलंदाज व्यवस्थित खेळत होते. मात्र त्यानंतर अचानक पावसाने हजेरी लावली. पावसामुळे सामन्यातील बराच वेळ वाया गेल्यामुळे पाकिस्तानला डकवर्थ लुईसच्या नियमानुसार, सुधारित लक्ष्य देण्यात आलं. त्यानुसार पाकिस्तानला १५ षटकांत १३६ धावा करणं भाग होतं. त्या आव्हानाने पाकचे पुरते कंबरडडेच मोडलले. सलामीवीर फखर झमान आणि बाबर आझम यांनी दुसऱ्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी करत संघाला आश्वासक सुरुवात करून दिलेली होती. मात्र नंतर केवळ दोनच धावांच्या फरकाने बाबर आझमचं अर्धशतक हुकलं. आणि त्यापाठोपाठ फखर झमान, मोहम्मद हाफिज, शोएब मलिक हे मातब्बर फलंदाज एकामागोमाग एक तंबूत परतले.

पाकिस्तानी संघाने विश्वचषक स्पर्धेत भारताकडून पराभूत होण्याची आपली परंपरा यावेळीही कायम राखली. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ८९ धावांनी मात केली. विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर मिळवलेला हा सातवा विजय आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment