करण, रणबीर आणि नीतू कपूर यांना करोना झाल्याचे ट्विट व्हायरल, रिधिमाने दिले स्पष्टीकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्याची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे समोर आले. त्यानंतर सोशल मीडियावर अभिनेता रणबीर कपूर, नीतू कपूर आणि दिग्दर्शक करण जोहरला करोना झाल्याच्या अफवा सुरु झाल्या होत्या. अनेक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता रणबीरची बहीण रिधिमा कपूरने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

नुकताच नीतू कपूर यांनी त्यांचा ६२ वा वाढदिवस सेलिब्रेट केला. त्यासाठी रिधिमाने एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला अमिताभ बच्चन यांचा नातू आगस्त्य नंदाने देखील हजेरी लावली असल्याचे व्हायरल होत असलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. अमिताभ बच्चन आणि अभिषेकची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर सोशल मीडियावर आगस्त्यच्या संपर्कात आलेल्या रणबीर कपूर, करण जोहर यांना करोना झाल्याच्या चर्चा सुरु होत्या. तसेच अनेक ट्विटही व्हायरल झाले होते.

आता रणबीरची बहीण रिधिमा कपूरने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या ट्विटवर स्पष्टीकरण दिले आहे. रिधिमाने व्हायरल होत असलेला एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे. या स्क्रिनशॉटमध्ये रणबीर कपूर, नीतू कपूर आणि करण जोहर यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे म्हटले आहे. तसेच अमिताभ बच्चन यांचा नातू आगस्त्य नंदाने बर्थडे पार्टीला हजेरी लावली असल्याचे देखील म्हटले आहे.

https://www.instagram.com/p/CCg3xrVnKfu/?igshid=1t8v11qnntwt3

सगळ्यांचे लक्ष वेधण्यासाठी तुम्ही हे करत आहात का? पण एखादी माहिती शेअर करण्यापूर्वी ती खरी आहे की खोटी हे पहायाला हवे. आम्ही सगळे ठिक आहोत. अशा अफवा पसवरणे बंद करा या आशयाची पोस्ट रिधिमाने केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.